Ahmednagar Politics: महायुतीच्या जागा वाटपात अकोले हा विधानसभा मतदार संघ भाजपाला मिळावा, तसेच आम्ही रामाला मानणारे आहोत. मात्र येथील आमदार रावणाला मानतात. त्यामुळे रावणाला मानणाऱ्या आमदाराला महायुतीमध्ये उमेदवारी देऊ नका. अशी मागणी कार्यकर्त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री खा. डॉ. अनिल जैन यांच्याकडे केली.
नुकतीच अकोले मतदार संघातील बुथ केंद्र प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची बैंक भाजपा कार्यालय येथे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे प्रभारी म्हणुन नियुक्त झालेले डॉ. अनिल जैन यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी महायुतीच्या जागा वाटपात अकोले हा विधानसभा मतदार संघ भाजपाला मिळावा तर येथील विद्यमान आमदार महायुतीचा असूनही भाजपा नेतेचे फोटो बॅनर वरती लावत नाही. लोकसभा निवडणूक मध्ये आमदार यांनी काम केले नाही असे अगस्ती साखर कारखाना माजी संचालक व्हा. चेअरमन प्रकाश नवले यांनी सांगीतले.
आम्ही रामाला मानणारे असून विद्यमान आमदार हे रावण संघटनांना बळ देतात. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये उमेदवारी देऊ नये, अशी मागणी तालुका सरचिटणीस राहुल देशमुख यांनी केली राज्यात महायुतीचे सरकार असतानाही तालुक्यासाठी भाजपा म्हणून कुठलाही निधी मिळत नसल्याची तक्रार कार्यालयीन सचिव कविराज भांगरे यांनी मांडली.
भाऊसाहेब आभाळे, बबलू धुमाळ सुशांत वाकचौरे बाबासाहेब उगले अरुण शेळके सुभाष वाकचौरे, माधव भोर, राहुल चव्हाण दिलीप कोटकर अशोक आवारी आदींनी अनेक विषय यावेळी मांडले. अकोले विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे ठेवण्याची मागणी प्राधान्याने करण्यात आली. या मागणीला उपस्थित सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहमती दर्शविली.
विधानसभा मतदार संघात संघटीतपणे तुम्ही कार्यकर्ते काम करीत आहात. प्रत्येक बुथवर नियोजन चांगले झाले तर, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करणे अशक्य नाही. या मतदार संघातील सध्याची परिस्थिती पाहीली तर जनता परिवर्तन करण्याच्या मानसिकतेच आहे. पक्षाची ताकद ही बुध स्तरापर्यंत अधिक भक्कम होण्यासाठी पुढचे दोन महिने सर्वांनी अधिक काम करण्याचे आवाहन अनिल जैन यांनी केले.
अनिल जैन म्हणाले की, महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येणे खुप गरजेचे आहे. कारण राज्य सरकारने घेतलेल्या योजनांना पुढे घेवून जाण्यासाठी सरकार आले पाहीजे. यासाठी बुचस्तरावर संघर्ष करा असे सुचित करुन, प्रत्येक बुध सक्षम करा, मतदानाचे नियोजन आत्तापासुनच सुरु करा.
बुध जिंकला तर विधानसभा निवडणूक जिंकु या मंत्रानुसार काम सुरु ठेवण्याचे अवाहन त्यांनी केले.तसेच अकोले विधानसभा मतदारसंघ भाजपासाठी सोडण्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या कोअर कमिटी मध्ये कार्यकर्त्यांच्या भावना पोहचविण्याची जबाबदारी घेत मतदारसंघ भाजपला मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.