Ahmednagar Politics : महसूलमंत्री विखे पाटील यांचे कोणी पाय धरले, हे उघड करण्यास भाग पाडू नका !

Published on -

Ahmednagar Politics : गणेश कारखाना बंद पडल्यानंतर या भागातील ऊस संगमनेर आणि संजीवनीने अक्षरशः लुटून नेला, तेव्हा आपल्या नेत्यांना गणेश कारखान्याची काळजी वाटली नाही. तुमच्या नेत्यांच्या कर्तृत्वामुळेच बंद पडलेल्या गणेश कारखान्यातील कामगार आणि ऊस

उत्पादकांची कशी वाताहत झाली, कारखान्यावर ७५ कोटींहून अधिक रक्कमेचे कर्ज करुन, कारखाना तोट्यात कोणी घातला ? कामगारांच्या ४२ महिन्यांच्या पगाराचे काय झाले? काळाकुट्ट आंधार ज्यांनी गणेश कारखान्याच्या नशिबी आणला याचे दुःख सुज्ञ सभासदांना आणि कामगारांना अजूनही असल्याने आनंद देत असल्याची तुमच्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे बडा घर पोकळ वासा असल्याचा टोला लहारे यांनी लगावला.

संगमनेर आणि संजीवनीने गणेश परिसरातील ऊस लुटून नेला, तेव्हा बघ्याची भूमिका का घेतली? असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र लहारे यांनी केला आहे. कारखान्यातील ‘सरपण’ ज्यांना पुरले नाही,

त्यांच्या कौतुकाचे गोडवे गाण्यापेक्षा गणेश कारखान्यात गुंवणूक करण्याचा आग्रह थोरात आणि कोल्हेंकडे धरावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात लहारे यांनी म्हटले आहे

बंद पडलेला कारखाना कोल्हे पॅटर्नने तुमचे नेते सुरू करु शकले असते, परंतु कारखाना पुन्हा सुरु व्हावा, ही इच्छाच नव्हती. उलट कोल्हे पॅटर्न सभासदांच्या माथी मारून सभासदांना दोन वर्षे भाव कमी घ्यायला लावला.

कामगारांना २० टक्के पगार कमी दिले आणि कारखाना बंद पाडल्यानंतर मशिनरी खोलून कोणी नेली, याचा सोयीस्कर विसर तुम्हाला आता पडला असल्याचे लहारे म्हणाले.

कारखाना सुरू होण्यापेक्षाही कार्यक्षेत्रातील ऊसावर संगमनेर आणि संजीवनीचा अधिक डोळा होता. आज तुमच्या नेत्यांनी गणेश कारखान्याच्या बाबतीत कळवळा दाखविण्यास केलेली सुरुवात ही सभासदांच्या डोळ्यात धुळफेकच आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २३ कोटी रुपयांची गुंतवणूक करून कारखाना अद्ययावत केला. करारात नसतानाही १ हजार निवृत कामगारांना ११ कोटी रुपयांची देणी अदा केली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ वर्षे गणेश कारखाना यशस्वीपणे सुरु राहीला. मागील वर्षी गाळपास आलेल्या ऊसाला प्रवरे प्रमाणे भाव दिला. सुस्थितीत कारखाना आल्यानेच संगमनेर आणि कोपरगावचे नेते कारखाना चालविण्यासाठी पुढे सरसावले आहेत;

परंतु संचालक मंडळाच्या निवडणूकीत मिळालेल्या विजयाने फार हुरळून जाऊ नका. कारण २०११-१२ या तुमच्या नेत्यांच्या कार्यकाळातील फरकाचे पेमेंट २ कोटी रुपये अद्यापही ऊस उत्पादकांना मिळालेले नाहीत, याची आठवण लहारे यांनी पत्रकात करून दिली आहे.

यापूर्वी कारखान्यातील सावळ्या गोंधळाचे फासे कोणाच्या गळ्यात कसे अडकलेले आहेत, यातून वाचण्यासाठी मंत्री विखे पाटील यांचे कोणी पाय धरले, हे उघड करण्यास भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी शेवटी पत्रकातून दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News