Ahmednagar News : खा. विखे आणि आ. राम शिंदे यांचे मनोमिलन

Published on -

Ahmednagar News : आमदार प्रा.राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जामखेड येथे नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या आनुशंगाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

या पत्रकार परीषदेच्या आगोदर जामखेड येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे लोकसभा निवडणुक प्रचार व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. तीन तासांच्या बैठकी नंतर आ. प्रा राम शिंदे व खा. सुजय विखे यांच्यामध्ये असलेले मदभेत तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नाराजी दुर झाली असल्याचे सांगण्यात आले.

पुढे बोलताना आ. राम शिंदे म्हणाले की पक्षाने आदेश दिल्यानंतर आमच्यामध्ये मतमतांतरं होऊ शकत नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील व अहिल्यानगर दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. अहील्यानगर दक्षिण मधून खा. सुजय विखेंना तिकीट फायनल झाल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला

यानंतर खा. सुजय विखे म्हणाले की, अहील्यानगर जिल्ह्यातील रस्ते गतीमान झाले आहेत. सध्या भिषण पाणी टंचाई असल्याने टँकर बाबत प्रशासनस्तरावर निर्णय घेतला जाईल. जामखेड ते सौताडा या रस्त्याच्या बाबत दोन ठेकेदार बदलले आहेत. तरी देखील काम संथ गतीने सुरू आहे

त्यामुळे ठेकेदारने हलगर्जीपणा केला असल्यास जुना कॉन्ट्रॅक्टर रद्द करुन नवीन निविदा काढुन नवा ठेकेदार देण्यात येईल. यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष सलिमभाई बागवान, तालुका अध्यक्ष अजय काशिद, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, शहर अध्यक्ष पवनराजे राळेभात, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे,

माजी जि.प. सदस्य सोमनाथ पाचरणे, माजी सरपंच संजय गोपाळघरे, उपाध्यक्ष बापुराव ढवळे, नगरसेवक अमित चिंतामणी, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, सरपंच वैजनाथ पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस लहु शिंदे, माजी संचालक पांडुरंग उबाळे,

युवा नेते बाळासाहेब गोपाळघरे, नगरसेवक बिबीशन धनवडे, संचालक डॉ. गणेश जगताप, सरपंच राजेंद्र ओमासे, चेअरमन जालिंदर चव्हाण, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष नागराज मुरुमकर, चेअरमन संजय कार्ले, सरपंच भिमराव कापसे, अजित यादव, चेअरमन उध्दव हुलगुंडे, राहुल चोरगे, दत्ता गीरी, तुषार बोथरा सह अनेक भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe