Eknath Khadse : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे हे एकेकाळी एकाच पक्षात होते. मात्र सध्या ते एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत. पक्षांतर्गत वादात दोघांचे बिनसले. यामुळे खडसे यांनी पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
असे असताना खडसे यांनी एक वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. ते म्हणाले, माझा कट्टर दुश्मन असला तरी चालेल मात्र आपल्या भाग सुजलाम सुफलाम होण्यासाठी गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आपला पाठीबा असेल, असे एकनाथ खडसे म्हणाले.

तसेच सुरेशदादा जैन मुख्यमंत्री व्हावे म्हणून मीच बाळासाहेबांकडे शिफारस केली होती. मला कार्यक्षम दूरदृष्टीचा व सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री पाहिजे आहे, असे मत त्यावेळी मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे व्यक्त केले होते.
आता याच निकषात जर आता गिरीश महाजन बसत असतील तर मला त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठीही कोणतीही अडचण नाही, सुरेश जैन यांना दिला तसाच गिरीश महाजन यांनादेखील माझा पाठिंबा राहिल. माझ्या भागाचा विकास व्हावा, असे खडसे यांनी म्हटले आहे.
यामुळे एकनाथ खडसे यांचे हे वक्तव्य अनेक अंगाने बघितले जात आहे. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला. त्यांनी पक्ष सोडताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती.