Eknath Shinde : मोठी बातमी! मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच सरकार पाडले, कोर्टात मोठा युक्तिवाद

Published on -

Eknath Shinde : राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठीच सरकार पाडले. शिंदे यांनी सरकार पाडले. त्यामुळे त्यांच्या बेईमानीचे बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं, असा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच सरकार पाडण्यात राज्यपालांचा वापर कसा झाला हे सुद्धा अधोरेखित केले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ते म्हणाले, बंड केल्यानंतर शिंदे गटाच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या. आधी सांगितले आम्हीच शिवसेना, नंतर सांगितले पक्षप्रमुखांना कंटाळून बाहेर पडलो. मुख्यमंत्री बनण्यासाठी शिंदेंनी सरकार पाडले. अनेकदा त्यांच्या भूमिका बदलत गेल्या.

शिंदेंच्या बेईमानीचे बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्री बनवले गेले. तसेच राज्यपाल सरकार अस्थिर करू शकत नाही. पण सरकार पाडण्यासाठी राज्यपालांचा वापर करण्यात आला आहे. राज्यपाल हे विधीमंडळ पक्षाशी संवाद ठेवू शकतात. वैयक्तिक कोणाशीही नाही.

राज्यपाल कोणा एकाला तुम्हीच आता मुख्यमंत्री असे म्हणू शकत नाही, राज्यपालांनी शिंदे यांच्या बाबतीत तेच केले, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय येणे अपेक्षित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe