Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी शिंदे गटाचे आमदार, मंत्री, अनेक नेते उपस्थित होते. यामुळे या सभेत कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना यावेळी उद्धव ठाकरे यांच्या अनेक वेगवेगळ्या वक्तव्य केलेल्या व्हिडिओ दाखवण्यात आल्या.
या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यावर काही सभांमध्ये टीका केली होती. त्या सभेतील हे व्हिडीओ होते. या व्हिडीओंची एकच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, माध्यमांनी कॅमेरे जरा आमच्यापेक्षा मागे फिरवावेत. लांबपर्यंत नागरिकांची झालेली गर्दी पहायला मिळेल. ही झालेली गर्दीच योगेश कदम यांच्या विजय निश्चित करणार आहे.
दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिडीओ दाखवले होते. त्याच प्रमाणे आजच्या सभेत शिवसेनेने उद्धव ठाकरे यांचे हे व्हिडीओ दाखवले. यामुळे या सभेपेक्षा व्हिडिओचीच जास्त चर्चा झाली.
शिवसेनेचे नेते रामदास कदम बोलत होते. ते म्हणाले, २००९ मध्ये तुम्ही गुहागर मधून मला तिकीट दिले. पण मी दापोलीतून मागितले होते. पण तिथे मला तुम्ही आपल्याच एका नेत्याला सांगून पाडले.