उद्या निवडणूक आज राडा ! ‘नाशिक शिक्षक’ साठी पाच हजारांचा भाव, विवेक कोल्हे समर्थक पैसे वाटप करताना ताब्यात

विधानपरिषद निवडणुकांचा रणसंग्राम सुरु असून उद्या (२६ जून) मतदान आहे. अनेक मातब्बरांच्या भेटीगाठी सुरु आहेत. या दरम्यान एक मोठे वृत्त समोर आले आहे. येवल्यात मतदारांना पैसे वाटप करताना काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हे पैसे वाटप करणारे उमेदवार विवेक कोल्हे यांचे समर्थक असल्याचे सांगितले जात आहे.

Pragati
Published:
paise vatap

निवडणुका म्हटलं की पैसे वाटप केली जाते असे म्हटले जाते. लोकसभा निवडणुकांवेळी तर भरपूर पैसे वाटले गेले असे आरोपही झाले. दरम्यान आता विधानपरिषद निवडणुकांचा रणसंग्राम सुरु असून उद्या (२६ जून) मतदान आहे. अनेक मातब्बरांच्या भेटीगाठी सुरु आहेत.

या दरम्यान एक मोठे वृत्त समोर आले आहे. येवल्यात मतदारांना पैसे वाटप करताना काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हे पैसे वाटप करणारे उमेदवार विवेक कोल्हे यांचे समर्थक असल्याचे सांगितले जात आहे.

शिक्षकांना मतदानासाठी पैसे वाटप करण्याचा प्रकार निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असताना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विठ्ठल नगर परिसरात मतदारांना पाच हजार रुपयांचे पॉकेट देताना निवडणूक विभागाचे अधिकारी व पोलिसांनी कोल्हेंच्या समर्थकांना पकडले असल्याची माहिती समजली आहे.

या पैसे वाटणाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी आता येवला शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू असल्याचे वृत्त आहे. उमेदवार विवेक कोल्हे यांचे हे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.

दोघे ताब्यात
मनमाडमध्ये मोठी कारवाई पोलिसांनी व तहसील विभागाच्या पथकाने केली असून मतदारांना देण्यासाठी तयार करण्यात आले पैशांचे पाकीट हस्तगत केले आहे. गोपनीय माहिती घेत पोलिसांनी गणेश नगर भागात छापा टाकला. पैसे असलेली पाकिटे, या पाकिटासोबत उमेदवार विवेक कोल्हे यांचे पॉम्लेट देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी करत आहेत.

विविध कारणांनी नाशिकची चर्चा
विविध कारणांनी नाशिकची चर्चा असून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील शिंदे गटाने पैसेवाटप केले असल्याचा आरोप केला होता. तर शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी नथ व पुरुष कपडे वाटप केल्याचा आरोप केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe