क्रेनमध्ये बिघाड ! जयंत पाटील, रोहिणी खडसे, अमोल कोल्हे बसलेल्या ट्रॉलीला वर हवेतच अपघात..

शिवस्वराज्य यात्रा किल्ले शिवनेरीवरून लेण्याद्रीकडे जात असताना जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिल्पास क्रेनमधून पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर क्रेन खाली येत असताना क्रेनमध्ये बिघाड होऊन क्रेनचा पाळणा तिरका झाल्याने

Published on -

शिवस्वराज्य यात्रा किल्ले शिवनेरीवरून लेण्याद्रीकडे जात असताना जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिल्पास क्रेनमधून पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर क्रेन खाली येत असताना क्रेनमध्ये बिघाड होऊन क्रेनचा पाळणा तिरका झाल्याने

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, खासदार अमोल कोल्हे हे थोडक्यात अपघातातून बचावले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शरद् पवार गटानेही शिवस्वराज्य यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात केली.

ही यात्रा शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली आहे. यात्रेत महायुतीचे काळे कारनामे जनतेपुढे उघड केले जातील, असा इशारा त्यांनी दिला. मात्र शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे.

शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. क्रेनच्या सहाय्याने पुतळ्याला पुष्पहार घालून खाली येत असताना

क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाला आणि क्रेनचा पाळणा तिरका झाला यामुळे जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबूब शेख खाली पडता पडता वाचले. सुदैवाने सर्वजण थोडक्यात बचावले.

अमोल कोल्हेंच्या हाताला दुखापत …
शिवस्वराज्य यात्रेदरम्यान क्रेनमध्ये बिघाड झाला. या अपघातात खासदार अमोल कोल्हेंच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळेच हाताला बँडेज लावून ते पुढच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाले.

शुक्रवारी सकाळी जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्रेनद्वारे पुष्पहार अर्पण केला जात होता, त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख थोडक्यात बचावले होते.

त्यानंतर जुन्नरच्या लेण्याद्रीत कोल्हे सभेला हजर राहिले, पण मंचरच्या सभेपूर्वी त्यांनी रुग्णालय गाठले. डॉक्टरांकडून उपचार घेत, हाताला बँडेज लावून ते यात्रेत सहभागी झाल्याचे दिसून आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe