लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यात. दरम्यान पुढील निवडणुकीपूर्वीचे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झालेय. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस असताना अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्यात.
यामध्ये सर्वात आधी भाजप नेते चंद्रकांत पाटील व उद्धव ठाकरे या दोघांची भेट होत दोघांत चर्चा देखील झाल्या. दरम्यान याची चर्चा राज्यात सुरु असतानाच आणखी एक अनपेक्षित घटना घडल्याचे समोर आले आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही विधानभवनाच्या लिफ्टजवळ एकत्र आले.
विशेष म्हणजे दोघांनीही लिफ्टनेही एकत्रच प्रवास केल्याचेही समोर आले. दरम्यान या लिफ्टमधील भेटी दरम्यान नेमके काय झाले याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान यावेळी त्यांच्यासोबाबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे देखील होते.
ना ना करते प्यार तुम्ही से..
दरम्यान या भेटीदरम्यान काय घडलं याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मिश्किल वक्तव्य केले. ते म्हणाले, आम्हाला लिफ्टमध्ये एकत्रपाहून अनेकांना वाटलं असेल की ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे… परंतु असे काही नसून ही अनौपचारिक भेट असून
या भेटीदरम्यान काहीच चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. तसेच भिंतीला कान असल्याने आम्ही पुढील चर्चा लिफ्टमध्येच करू असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.
प्रवीण दरेकर म्हणतात..
प्रवीण दरेकर यांनी या लिफ्टमधील भेटीविषयी प्रसारमाध्यमांशी सांगताना म्हटले की, लिफ्टमध्ये ज्यावेळी मी आलो त्यावेळी सन्माननीय देवेंद्र व उद्धवजी व सोबत मिलिंद नार्वेकरही होते.
यावेळी लिफ्टमध्ये कोणीतरी बोलले की, ‘आपण दोघं एकत्र आहात, बरं वाटतं’. त्यावर लगेच उद्धवजी ठाकरे यांनी माझ्याकडे बोट केले व म्हणाले ‘याला पहिले बाहेर काढा’. त्यानंतर आणखी काही संवाद होत हास्यविनोद झाल्याचे ते म्हणाले.