Ahmednagar Politics : आधी सुजय विखे त्यानंतर पुन्हा पितापुत्र दोघेही अमित शहांच्या भेटीला ! विषय कांद्याचा की अहमदनगर लोकसभा तिकिटाचा? चर्चांना उधाण

Ahmednagarlive24 office
Updated:

कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी व यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व पुत्र खासदार डॉ. सुजय विखे यांनी भेट घेतली. त्याआधी देखील खा. सुजय विखे यांनी अमित शहा यांची याविषयावर भेट भेटली होती.

या भेटी कांद्याच्या प्रश्नावर असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु असे असले तरी नागरिकांत मात्र दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या तिकीटविषयी ही चर्चा होती असे म्हटले जात आहे. ही भेट म्हणजे आगामी लोकसभेसाठी मोर्चेबांधणी होती अशी चर्चा आहे.

कांदा उत्पादकांना दिलासा, सोबतच लोकसभेचे तिकीटही मिळणार?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे दुसऱ्यांदा इच्छुक आहेत. लोकसभेच्या निमित्त महिन्याभरापूर्वी डॉ. विखे यांनी मतदारसंघात चाचणीनिमित्त साखर डाळ वाटप करून पेरणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर आठ दिवसांपूर्वी खासदार डॉ. विखे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

गुरुवारी दुसऱ्यांदा खासदार विखे हे पिता तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समवेत शहा यांना भेटले. कांद्याच्या निर्यात बंदीचे निमित्त असले तरी ही भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, कांद्याच्या निर्यात बंदी बाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेईल, असे आश्वासन शहा यांनी विखे पिता पुत्रांना दिले आहे.

  • कांदा निर्यात बंदी नाराजीचे कारण

  • कांदा निर्यात बंदी केल्याने भाव गडगडले. त्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे. ही नाराजी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला अडचणीची ठरू शकते. त्यामुळे आता यावर काहीतरी निर्णय घेऊन आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार काही पावले उचलू शकते असा अंदाज आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe