Ahmednagar Politics : माजी खासदार शेळकेंच्या नातवाचा भाजप प्रवेश

Published on -

Ahmednagar Politics : नगर तालुक्यातील कॉंग्रेसचे माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे नातू अंकुश रावसाहेब शेळके यांनी बुधवारी (दि. १९) मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव | कर्डिले यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश झाला असून त्यामुळे नगर तालुक्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी होण्यापूर्वी तब्बल १२ वर्षे अगोदर नगर तालुक्यात माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांनी या तीन पक्षांची तालुका महाआघाडी केली होती.

तेव्हापासून सलग ३ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका महाआघाडीने एकत्र लढवत माजी मंत्री कर्डिले गटाला पराभूत केलेले होते. नुकत्याच झालेल्या नगर तालुका बाजार समिती निवडणुकीतही महाआघाडी विरुद्ध कर्डिले गट अशी लढत झाली होती.

त्यात अंकुश शेळके यांनी महाआघाडीकडून उमेदवारी केली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. दादा पाटील शेळके यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके हे महाआघाडीचे नेतृत्व करत आहेत.

महाआघाडीच्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यामुळे अंकुश पाटील शेळके यांचा भाजपा प्रवेश महाआघाडीसाठी धक्का मानला जात आहे. अंकुश शेळके यांचे वडील व जिल्हा बँकेचे माजी संचालक रावसाहेब शेळके यांची व माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांची मैत्री सर्वश्रुत आहे.

शेळके यांच्या भाजपा प्रवेशाच्या मागे या मैत्रीची किनार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महाआघाडीला धूळ चारण्यासाठी कर्डिले यांनी हा डाव टाकल्याचे बोलले जात असून त्यांच्याच पुढाकारातून हा पक्ष प्रवेश झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News