Gautami Patil : काही दिवसांपूर्वी डांन्सर गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर गौतमी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता याबाबत तिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ती म्हणाली, माझी बोलण्याची मनस्थिती नाही. पण तरीही मी आज तुमच्यासमोर आली आहे. या कठीण परिस्थितीत तिच्या चाहत्यांनी तिला चांगली साथ दिली. त्यामुळे तिने याबद्दल समाधान व्यक्त केले. लोकं आपल्यासोबत आहेत या गोष्टीचे अभिमान वाटत असल्याचे ती म्हणाले.
ती म्हणाली, आपल्याला त्यांची साथ आहे, या गोष्टीचं खूप छान वाटतंय. पोलीस तपास करत आहेत. आरोपींवर कारवाई होईल. महिला आयोग माझ्यासोबत आहे त्याबद्दल बरं वाटलं, असं गौतमी पाटील म्हणाली.
गौतमी पाटील पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलवत असताना कुणी समाजकंटकाने तिचं चोरुन चित्रिकरण केलेले. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
या व्हिडीओवरुन प्रचंड मोठा वाद निर्माण झालेला. अनेकजण गौतमीच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहिले. गौतमी पाटीलने आज नाशिक येथील कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, या सगळ्या वादानंतर गौतमी आज पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आली. यावेळी तिने संबंधित प्रकारावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ती काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.