‘आधी स्वतः निवडून येण्याची गॅरंटी घ्या’.. विखेंना थेट इशारा ! कोल्हेंनी विखेंबाबत केला एक मोठा गौप्यस्फोट

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेतील वातावरण लोकसभेवरून तापलेले असतानाच आता उत्तरेत मात्र थेट विधानसभेचीच तयारी सुरु केल्याचे चित्र आहे. यावरून सध्या विखे पाटील विरोधात कोल्हे असे राजकीय वाक्युद्ध पेटले आहे.

कोल्हे व विखे विरोधक थोरातांची जवळीकता व याने अस्वस्थ झालेले विखे व कोल्हे यांचे राजकीय विरोधक काळे यांची एकी सध्या चर्चेचा विषय झाला आहे. भाजपचेच नेते एकमेकांना शह देण्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत.

दरम्यान आता विवेक कोल्हे यांनी मोठा राजकीय इशारा विखे पाटील यांना दिला आहे.

* काय म्हणाले विवेक कोल्हे

मंत्री विखे पाटील यांनी कोपरगावमध्ये येत कोल्हे यांच्यावर टीकास्त्र डागले होते. काळे निवडून येतील ही माझी गॅरंटी आहे बाकीच्यांची मी जिरवतो असे विखे पाटील म्हटले होते. याचा समाचार घेत विवेक कोल्हे यांनी म्हटलं आहे की, त्यांनी आपल्या स्वतःच्या निवडून येण्याची गॅरंटी घ्यावी.

आमची गॅरंटी कोपरगाव मतदार संघातील साडेतीन लाख जनता घेईल, मात्र विखेंनी ज्यांची ग्यारंटी घेतली त्यांची काय स्थिती झाली हे सर्वश्रुत आहे असा इशाराच त्यांनी दिला. महसूल मंत्री दौ-यावर आले असताना जिरवाजीरावी व गाळ काढण्याची भाषा वापरली.

अशी अपेक्षा त्यांच्याकडून नव्हती. ३ वर्ष लालदिवा, २५ वर्ष खासदारकी, जिल्हा परिषद, साई संस्थान, दक्षिणेत खासदारकी यासारख्या अनेक गोष्टी कोपरगावकरांनी जावयाला दिल्या, मात्र, त्यांनी कोपरगावकरांना काय दिले असा सवालच त्यांनी केला.

* कोल्हे यांकडून मोठा गौप्यस्फोट

विवेक कोल्हे यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. विखे यांनी आम्हाला पडणायचे षडयंत्र केले. विखेंच्या याच जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील पाच आमदार कमी झाले. आम्हाला पाडण्याचे काम केल्याने गिफ्ट म्हणून आपल्या मेहुण्याला राष्ट्रीय डेअरी व महानंदावर घेण्याचे काम विखेनी केले असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

* काय म्हणाले होते मंत्री विखे?

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगावमध्ये म्हटले होते की, कोपरगाव तालुक्यातील गाळ काढण्याची वेळ आलेली आहे. आता त्याची सुरुवात करण्यात आली आहे अशी टीका त्यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांच्यावर नाव न घेता केलेली होती.

तसेच महायुतीचा आमदार आशुतोष काळे आहे आणि त्यांना माझी गॅरंटी आहे. त्यामुळे कोणाचाही विचार करू नका असे विखे पाटील म्हणाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe