सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच सुरू होणार एलपीजी गॅस सिलेंडरची सबसिडी, किती मिळणार सबसिडी?

Ahmednagarlive24 office
Published:

LPG Gas Subsidy : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहेत. निवडणुकांचा काळ जवळ येत असल्याने आता केंद्रातील मोदी सरकार मतदार राजांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आता देशातील गरीब परिवारांना स्वस्तात गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. खरे तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोन रुपयांनी कमी झाल्यात. दरम्यान या किमती कमी करण्यापूर्वी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी केल्या होत्या.

तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीमध्ये शंभर रुपयांपर्यंतची वाढ केली होती. यानुसार या योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरसाठी तीनशे रुपये सबसिडी मिळू लागली आहे. म्हणजेच सबसिडीचा लाभ घेतल्यानंतर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 603 रुपयात गॅस सिलेंडर उपलब्ध होत आहे.

मात्र गैरअनुदानित गॅस सिलेंडरचे दर देशात एक हजार रुपयांपेक्षा अधिक आहेत. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर लखनौमध्ये 1,140 रुपये, दिल्लीत 1,103 रुपये, पाटण्यात 1,201 रुपये, जयपूरमध्ये 1,106 रुपये, अहमदाबादमध्ये 1,110 रुपये आणि मुंबईत 1,102 रुपयांना उपलब्ध आहेत.

म्हणजेच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त 903 रुपयात गॅस सिलेंडर मिळत आहे आणि यावर त्यांना तीनशे रुपयांची सबसिडी दिली जात आहे. अशा तऱ्हेने त्यांना गॅस सिलेंडर फक्त आणि फक्त 603 रुपयात उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे हा सबसिडीचा पैसा आता संबंधितांना मिळू देखील लागला आहे.

दरम्यान, आता आगामी लोकसभेच्या निवडणुका पाहता सर्वांसाठीच गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या जाऊ शकतात अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. जर आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने हा निर्णय घेतला तर निश्चितच महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दुसरीकडे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने पाचशे रुपयात गॅस सिलेंडर उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिलेले आहे.

दरम्यान या संबंधित राज्यांमध्ये मोदी सरकारची ही गॅरंटी खरी ठरते का हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे. तसेच आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या किमती खरंच कमी होतील का ? याकडे देखील सर्वसामान्यांचे विशेष लक्ष राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe