Ahmednagar Politics : पुढील आठवड्यात आचार संहिता लागू शकते असे म्हटले जात असून लोकसभा निवडणुकीच्या तारखा देखील कधीही घोषित होवू शकतात. दरम्यान महायुतीमध्ये शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी आणि भाजप असे तीन पक्ष आहेत.
त्यामुळे जागेचे वाटप कसे होणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या 48 जागांवर कुणाकुणाला उमेदवारी दिली पाहिजे यासाठी तीनही पक्षात खलबते सुरु आहेत. दरम्यान आता महायुतीच्या जागांवरील उमेदवार फिक्स झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपप्रणित एनडीएने लोकसभेच्या देशातील 197 उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात सध्या महाराष्ट्राच्या जागांचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तर विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातील नेमके कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
शिर्डीत खा. लोखंडे व दक्षिणेत खा. सुजय विखे यांना पुनःश्च संधी मिळणार का यांच्या अनेक चर्चा सध्या झडू लागलेल्या आहेत. दरम्यान आता महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी एका मीडियाने व्हायरल केली आहे. त्यांनी असा दावा केलाय की ही आतली यादी त्यांच्या हाती आली आहे.
महाराष्ट्रातील महायुतीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा पुढच्या 2 दिवसांत संपेल असे दिसते कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत मुंबईत आज मंगळवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असून यात उमेदवार निश्चिती होईल असे दिसते. दरम्यान या आलेल्या यादीत अहमदनगर व शिर्डी जागा कोणाकडे असेल हे देखील दाखवण्यात आले आहे.
शिर्डीमधून शिंदे गटाचा पत्ता कट
शिर्डीमध्ये शिंदे गटाचे खा. सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत. परंतु महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाला मिळणार नसल्याचे दिसत आहे. ही जागा बहुतेक रामदास आठवलेंना जाईल असे या यादीवरून दिसते.
भाजप शिर्डीमध्ये रामदास आठवलेंना तिकीट देऊ शकते. या जागेवर याधीही रामदास आठवले यांनी दावा केला होता. आता ही जागा शिंदे गटाऐवजी भाजप रामदास आठवले यांना देऊ शकते असे म्हटले जात आहे.
नगर दक्षिणेतून खा. सुजय विखे यांनाच संधी
अहमदनगर लोकसभेसाठी खा. सुजय विखे हेच उमेदवार भाजपकडून राहतील असे या यादीत दिसते. त्यामुळे खा. विखे याना भाजप उमेदवारी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आता या चर्चांना पूर्णविराम मिळणार असून
दक्षिणेसाठी खा. सुजय विखे हेच भाजपचे लोकसभेचे उमेदवार असतील हे सध्या तरी या यादीनुसार समोर आल्याचे दिसते.