Gulabrao Patil : शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील त्यांच्या एका व्हिडिओमुळे ते चर्चेत आले आहेत. एका विवाह सोहळ्यात गुलाबराव पाटील यांनी केलेल्या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे.
या विवाह सोहळ्यातील मुलीकडच्या मंडळीचे आडनाव पवार होते. यावरुन गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण तुम्ही सकाळी-सकाळी शपथ घेता आणि काय करुन टाकता ते आम्हाला माहिती नाही, असे म्हणतात एकच हशा पिकला.

ते म्हणाले, त्यामुळे पवारांना कायम बरोबर ठेवावे लागते. कारण पवारांची बुद्धी चालते तशी कोणचीही चालत नाही. जळगाव जिल्हातील त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात गुलाबराव पाटील मंगळवारी लग्नात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी गेले होते.
वधू ही पवार नाव असलेल्या कुटुंबातील असल्याने गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणावेळी फटेकबाजी करुन कार्यक्रमाला एकच रंगत आणली. मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या विशिष्ट भाषा शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात.
अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सकाळी शपथविधी घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. त्यावरुन विरोधी पक्षांमध्ये तुफान कलगितुरा रंगला. यामुळे अनेकदा टोलेबाजी होत असते.