Gulabrao Patil : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे ते चर्चेत आले आहेत. ते म्हणाले, एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला. त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. विरोधक टीका करतात, त्यांना माझा चॅलेंज आहे, शरद पवार… मग एकनाथ शिंदे कोण आहेत? ते पण मराठा आहेत.
आम्ही मराठा मुख्यमंत्री केला. मी मेंटल आहे का?, असे गुलाबराव पाटील म्हणाले. यामुळे राजकारणात याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, असा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येतो.

अनेक ठिकाणी अनेक लोकांकडून देखील गद्दार असे म्हटले जाते. आता ठाकरे गटाची ही टीका पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्य केली आहे. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांच्यासोबत गुलाबराव पाटील हे आघाडीवर होते.
जळगावातील बिलखेडा गावात विविध विकासकामे आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी पाटील यांनी विरोधकांच्या गद्दारीच्या आरोपावर थेट प्रतिहल्ला चढविला.
विरोधाला विरोध करायचा पण मतदार संघात काही काम करायचे नाही. बिलखेडेत साधी एक मुतारी हे लोक बांधू शकले नाहीत आणि भाषणं ठोकतात, असा जोरदार हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला.