मुंबई : शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी आपल्या पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अडसूळांच्या राजीनाम्यामागचे कारण सांगितले आहे.
आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीचा दबाव आहे. गेल्या काही दिवसांपासून आनंदराव यांच्यावर ईडीची कारवाई सुरु होती. काही भाजप नेत्यांनी देखील त्यांना अटक होऊ शकते अशी वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे दबावापोटी अडसूळांनी हे पाऊल उचलले आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
अडसूळांच्या राजीनाम्याची बातमी पाहिली. महिनाभरापासून ईडीने कारवाया केल्या. घरावरही धाड पडली, भाजपकडूनही अडसूळ यांच्यासंदर्भात बातम्या येत होत्या. ही कारवाई चुकीची असल्याचे आनंदराव सतत म्हणाले. पण ईडीकडून कठोर कारवाई सुरु होती. आता अडसूळांनी राजीनामा दिल्यानंतर या विषयी आम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करु, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.