Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. घटनापीठाच्या कोर्ट क्रमांक दोनमध्ये ही सुनावणी होणार असून प्रकरण कामकाज यादीत पहिल्याच क्रमांकावर आहे.
या सुनावणीचे थेट प्रसारण देशातील नागरिकांना पाहता येणार आहे. https://main.sci.gov.in/display-board या लिंकवर थेट प्रसारण पाहता येईल. सकाळच्या सत्रातच या प्रकरणावर कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
तब्बल ४० दिवसांनंतर यावर पुन्हा सुनावणी सुरू होत आहे. मागील तारखेला चिन्हासंबंधीचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोपविण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे आज थेट मूळ प्रकरणावर युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता आहे.
तसेच याच्या नियमित सुनावणीच्या तारखाही ठरविल्या जाण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश उदय लळित यांनी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाची नियुक्ती केली आहे. या खंडपीठात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी नरसिंह यांचा समावेश आहे.
यांचाही समावेश आहे. यातील चंद्रचूड हे पुढील सरन्यायाधीश म्हणून घोषित झाले आहेत. धाडसी निकाल देण्यासाठी ओळखले जाणारे चंद्रचूड यासंबंधी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.