उदयनराजेंची कॉलर उडवायची स्टाईल कशी पडली? ‘तो’ यात्रेत किस्सा घडला अन कॉलर उडवायची स्टाईल रूढ झाली

Ahmednagarlive24 office
Published:
udayan raje

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी असल्याने अनेक मतदार संघ तसेच अनेक नेते मंडळी चर्चेत आहेत. परंतु अशी काही राजकीय व्यक्तिमत्व आहेत ते नेहमीच चर्चेत असतात, लोकप्रिय असतात. त्यातीलच एक म्हणजे छत्रपती उदयनराजे. ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.

त्यांचा चाहता वर्ग त्यांच्यासाठी अगदी वेडा असतो. उद्यनराजेंची एक खास स्टाईल लोकप्रिय आहे. ती म्हणजे कॉलर उडवण्याची स्टाईल. अर्थात ती स्टाईल म्हणजे त्यांची एक ओळखच निर्माण झाली आहे. अगदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देखील ही स्टाईल करण्याचा मोह आवरत नाही.

पण अनेकदा प्रश्न पडतो की उद्यनराजेंची ही स्टाईल नेमकी कशी पडली. त्यांना ही सवय कशी लागली व ही स्टाईल इतकी लोकप्रिय झाली की ती त्यांची ओळखच बनली. चला पाहुयात …

कॉलर उडवण्याची स्टाईल नेमकी कशी व कधीपासून सुरू झाली याबाबत स्वतः उद्यनराजेंनीच माहिती दिलीये. ते म्हणालेत, मागे एकदा आम्ही कासला घाटाच्या मंदिराची यात्रा होती त्यासाठी तेथे गेलेलो होतो. त्यावेळी तिथे प्रत्येकाने स्टाईल करायची असं ठरवलं. मग त्यावेळी कुणी कॉलर मागे गॉगल लावला तर कुणी आणखी काय केलं. त्यावेळी माझा मित्र मला म्हणाला तुमची काय स्टाईल आहे? ती देखील दाखवा.

त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, माझी कुठली स्टाईल-फिईल नाही. पण सगळ्यांनी आग्रह धरल्यानंतर मी म्हटले की, मला एवढा अधिकार आहे, कोणीही सांगू द्या, कुठंही, केव्हाही तयार आहे असे म्हणत मी कॉलर उडवून दाखवली होती. तेव्हापासून ही कॉलर स्टाईल प्रचलित झाली असून तीच आता ओळख देखील झाल्याचे उदयनराजेंनी सांगितले.

महाराष्ट्रभर लोकप्रियता
उदयन राजेंची संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता आहे. ते छत्रपती शिवरायचे वंशज असल्याने त्यांचा मानसन्मान अगदी वेगळा आहे. जनमाणसांच्या मनावर ते अधिराज्य करतात असे म्हणणे वावगे ठरू नये.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe