मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या सुरु असलेल्या सत्ता संषर्षाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय वाटतं? बंडखोरीविषयी आणि भविष्यातील निवडणुकांविषयी त्यांची मते एका वादळी मुलाखतीमध्ये मांडली आहेत. ही मुलाखत शिवसेनेते मुखपत्र सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत हे घेत आहेत. या मुलाखतीचा आज दुसरा टिझर रिलीज झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली आहे. ही मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टिझर काल संजय राऊतांनी सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. हा टिझर साधारण ४५ सेकंदाचा आहे. त्यात संजय राऊत राज्यातील राजकीय स्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी थेट सवाल करताना पाहायला मिळत आहेत. राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उद्धव ठाकरेंही त्याच जोमात आणि ठाकरे शैलीत उत्तर देताना पाहायला मिळत आहे.

पहिल्या टीझरमध्ये संजय राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये, निवडणूक आयोगापुढे एक नवीन खटला उभा राहतोय, धनुष्यबाण कुणाचा? ठाकरेंना पुरावे द्यावे लागत आहेत शिवसेना खरी किंवा खोटी, आज जी फूट दिसतेय शिवसेनेत, याआधी राणे, भुजबळांनाही पाडता आली नव्हती, नक्की काय चुकलं असावं आपलं, की महाविकास आघाडीचा प्रयोगच चुकला? अशा प्रश्नांचा समावेश आहे.