Shirdi Politics : शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभेसाठी मीच लढणार ! घोलप यांच्या ‘या’ दाव्यानंतर वातावरण पुन्हा तापले

Published on -

Shirdi Politics : शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. याठिकाणी खा.सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे खासदार होते.

परंतु आता ते शिंदे गटात असल्याने येथे शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) उमेदवार द्यावा लागणार आहे. यासाठी अनेक जण स्पर्धेत आहेत. दरम्यान आता माजी आमदार बबनराव घोलप यांनी या जागेवर आपण लढणार असे स्पष्टच सांगितले आहे.

काय म्हणाले माजी आ. घोलप

माजी आमदार बबनराव घोलप हे शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. ते म्हणाले आहेत की,ते स्वतः व चिरंजीव योगेश बबनराव घोलप आम्ही दोघे ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत.

पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्यावर हे सगळं अवलंबून असणार आहे. मी शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता असून शिवसेनेतून देवळाली मतदारसंघात मी पाच वेळा आमदारपद भूषवले.

निवडणुकीच्या काळात माझ्यावर काही केसेस दाखल करण्यात झाल्या असल्याने तो निकाल न्यायप्रविष्ट असल्याने निकाल लागल्यानंतर मी शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेतूनच निवडणूक लढवणार आहे, असा दावा घोलप यांनी केलाय.

भानुदास मुरकुटे यांचेही नाव चर्चेत

भाऊसाहेब वाकचौरेंचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांचेही नाव चर्चेत आहे. तसेच त्यांची शिवसेनेत एंट्री झाल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून वाकचौरे यांचे देखील उमेदवारीसाठी पुढे येत आहे.

मंत्री भुजबळांनीही केली होती टीका

मंत्री छगन भुजबळ यांनीही मागे बबन घोलप यांच्यावर टीका केली होती. घोलप हे सध्या आपण खूप निष्ठावान असल्याचे दाखवत आहेत. मात्र १९९१ मध्ये जेव्हा शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाण्यासाठी ३६ आमदारांची यादी तयार झालेली होती त्यात घोलप यांचे नाव व स्वाक्षरी सगळ्यात वरती होती असे त्यांनी म्हटले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News