प्रधानमंत्री सहाय्यता निधीत खा. लंके राज्यात अव्वल ! खा. लंकेंनी स्वतःसह शरद पवारांचाही कोटा संपविला

Published on -

प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य निधीचा राज्यात सर्वाधिक रूग्णांना लाभ मिळवून देत खासदार नीलेश लंके यांनी नवी दिल्लीमध्येही आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. दरवर्षी प्रत्येक खासदाराला असलेला ३५ केसचा कोटा संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोटयातून २७ केसेससाठी निधी मिळवत नीलेश लंके हे सर्वाधिक रूग्णांना लाभ मिळवून देणारे खासदार ठरले आहेत.

पाच वर्षांपूर्वी विधानसभेत पारनेर-नगर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना खा. नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा राज्यात सर्वाधिक रूग्णांना लाभ मिळवून दिला होता. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे नीलेश लंके यांनी या योजनेचा राज्यात सर्वाधिक रूग्णांना लाभ मिळवून दिल्याचे जाहीर केले होते.

खा. नीलेश लंके यांच्याकडे दररोज अनेक रूग्ण किंवा त्यांचे नातेवाईक उपचारासाठी मदत मिळावी यासाठी येतात. खा. लंके हे रूग्णाच्या आजाराची माहीती घेऊन मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान सहाय्यता निधीतून त्यास मदत मिळेल का याची खात्री करतात.

संबंधित आजार दोन्ही योजनांच्या निकषामध्ये बसती नसतील तर लंके हे स्वतः धर्मदाय रूग्णालयांशी संपर्क करून त्या रूग्णावर उपचार करण्याची व्यवस्था करतात. वेळप्रसंगी सामाजिक संस्थांशी संपर्क करून संबंधित रूग्णास मदत मिळवून देण्यासाठीही लंके यांची धडपड असते.

हजारो रूग्णांना मदतीचा हात
कोणत्याही योजनेमार्फत प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी खा. लंके यांच्या पारनेर, नगर व मुंबई दिल्ली येथील संपर्क कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा असून या यंत्रणेमार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांचा दररोज आढावा घेतला जातो. प्रस्तावात काही तृटी असतील तर संबंधित रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्रृटी दुर केल्या जातात. आरोग्याच्या मदतीसाठीची यंत्रणा सतर्क असल्याने गेल्या पाच, साडेपाच वर्षात हजारो रूग्णांना आजवर लंके यांच्या माध्यमातून मदत मिळाली आहे.

रूग्णसंख्येची मर्यादा नको
खा. नीलेश लंके हे संसदेत गेल्यानंतर त्यांचा ३५ रूग्णांचा कोटा काही महिन्यात संपला. त्यामुळे त्यांनी पाठविलेले प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालयाकडे पडून होते. त्यासाठी प्रत्येक खासदारासाठी दरवषसाठी घालण्यात आलेले ३५ रूग्णांचे बंधन दुर करून अमर्याद रूग्णांना मदत देण्याची मागणी खा. लंके यांनी यापूर्वीच संसदेत केली आहे.

१ कोटी ८६ लाख रूपयांची मदत
खासदार नीलेश लंके यांच्या कोटयातील ३५ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोटयातील २८ अशा एकूण ६३ रूग्णांना आजवर १ कोटी ८६ लाख रूपयांची मदत मिळवून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!