‘मातोश्री’वर बसून हकालपट्टी करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे का?- रामदास कदम

मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर शिवसेनेला गळतीच लागली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेला रामराम करत शिंदे आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर पक्षाविरोधात कारवाया केल्याचे सांगत शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे रामदास कदम यांना देखील पक्षातून हकालपट्टी केल्याचे समोर आले. त्यावर आता रामदास कदमांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझी हकालपट्टी करण्याआधी मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही असे सांगत रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘मातोश्री’वर बसून हकालपट्टी करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे का? असा प्रश्नही रामदास कदम यांनी विचारला आहे.

आपल्या मनातील खदखद मांडताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले होते. आपला मुलगा योगेश कदमवरही अन्याय झाल्याचा खळबळजनक आरोप यावेळी रामदास कदम यांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe