Jamkhed Politics : यंदाची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक विशेष लक्षणीय होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाराष्ट्रातील दोन पक्षांच्या उभ्या फुटी नंतर प्रथमच विधानसभेची निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा काटेदार लढाई होणार असे दिसते. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी मधील उमेदवार एकमेकांना शह देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच काल मंगळवारी रात्री जामखेड विधानसभा मतदारसंघात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. खरेतर, या विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी लढत होणार आहे. या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू असून दोन्ही नेते सध्या प्रचारात गुंग आहेत.
दरम्यान महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रोहित पवार यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच मोठा फटका बसलाय. तालुक्यातील देवदैठणमधील सोसायटी चेअरमन, दोन संचालक, दोन ग्रामपंचायत सदस्यांस १०० पेक्षा अधिक प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांच्या उमेदवारीवर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे.
विशेष बाब म्हणजे या शेकडो कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय. कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी व अभिमानासाठी सुरु असलेल्या ‘भूमिपुत्रांच्या’ लढ्याला बळ देण्यासाठी आम्ही भाजपात आलोत असे या कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटले आहे. आपला तो आपलाच असतो अशी भावना व्यक्त करत या सर्वांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला असल्याने ऐन निवडणुकीच्या काळात कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राजकीय बळ वाढले असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, दैवदैठणमधील या राजकीय भूकंपामुळे रोहित पवारांना मोठा राजकीय धक्का बसू शकतो असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. भाजपा नेते संजय काका काशिद यांच्या पुढाकारातून व जामखेड बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, महारूद्र महारनवर यांच्या सहकार्यातून याच्या कडून कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश घेतलाय. यामुळे विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचे राजकीय वजन वाढले आहे.
या शेकडो कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा काल मंगळवारी चौंडी येथे संपन्न झाला आहे. या शेकडो कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भाजपा पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख दिपक जंजिरे, पांडुरंग उबाळे, नगरसेवक अनिल गदादे, लहू शिंदे, सुनिल यादव, संतोष गव्हाळे सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या इच्छेने भाजपात प्रवेश घेतला
दैवदैठणमधील सोसायटीचे चेअरमन महादेव भोरे, सुरेश तात्या भोरे,मकरंद भोरे, अतुल भोरे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ भोरे, ग्रामपंचायत सदस्य सतिश सरगर, शहाजी सरगर, योगेश हजारे, बाळू चिलगर, अमोल बनकर, सोसायटी संचालक बाबा चिलगर, सोसायटी संचालक संभाजी जमदाडे, सचिन हजारे, बाळासाहेब सरगर, भागवत सरगर, शहाजी सरगर, दत्ता जमदाडे, अमोल राऊत,
प्रवीण बनकर, तानाजी महानवर, बाजीराव चिलगर, गणेश चिलगर, पांडुरंग चिलगर, उत्तम चिलगर, योगेश चिलगर, वैजनाथ चिलगर, सावता बनकर, संतोष जमदाडे, गणेश बनकर, राजेंद्र चिलगर, गणेश सरगर, कचरू सरगर, विकास राऊत, आबा चिलगर, योगेश हजारे, खंडेराव महानवर, अतुल भोरे, प्रशांत सरगर, गजेंद्र सरगर, दत्ता जावळे, काका धेंडे, बाळू चिलगर, भाऊ साठे, अभिषेक हजारे, नामदेव गुळवे, गुलाब सरगर, अशोक चिलगर,
प्रदीप लाला भोरे,बबन तोरांबे, राम चिलगर, सुरेश भोरे, मेघराज बनकर, नारायण टिळेकर, पांडुरंग महानवर,राजेंद्र चिलगर, राज गर्जे, योगेश सरगर, लहू सरगर, अजय बनकर, सावता बनकर, गणेश बनकर, संतोष जमदाडे, प्रशांत बनकर,दादा जमदाडे, ज्ञानेश्वर महानवर, सतीश हजारे, ऋषिकेश भोरे, ज्ञानेश्वर चिलगर, लक्ष्मण चिलगर, तुषार हजारे,विकास राऊत, दीपक बनकर, गणपत बनकर, अक्षय बनकर, अमोल बनकर, दिनकर सरगर या शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे.
यामुळे विधान परिषद आमदार राम शिंदे यांच्यासहित महायुतीच्या खेम्यात आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. यामुळे आता कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार आहे.