Jayant Patil : राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली आहे. असे असताना त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचे पत्र १० मार्चला निघाले आहे. ही चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्षात आणून दिली आहे.
यावरून जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. विधानपरिषदेच्या गटनेतेपदासाठी एकनाथ खडसे यांचे नाव सुचवले आहे. पण, १० मार्चला एक पत्रक निघाले आहे. यामध्ये विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद गटनेते प्रतोद पद रिक्त आहे.
असे असताना महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदावर एकनाथ शिंदे यांची आणि अनिकेत तटकरे यांची प्रतोद म्हणून उपसभापतींनी नियुक्ती केली आहे. यामुळे याकडे लक्ष वेधून घेतले आहे.
यामुळे ही नवीन पद्धत एकनाथ शिंदेंनी सुरु केली आहे. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे एकच हशा झाला आहे.
यावर याविषयी सखोल माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिले. जयंत पाटील यांनी दिलेली माहिती विधानपरिषदेच्या कामाकाजाची दिसत आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या कामकाजाबद्दल विधानसभेच्या सभागृहात चर्चा करता येणार नाही, असेही ते म्हणाले.