Jayashri Thorat News : महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी हळूहळू उमेदवारांची घोषणा केली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांशी उमेदवारांची नावे महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून फायनल झालेली आहेत. संगमनेर मधून मात्र महायुतीकडून कोण उभे राहणार हे अजून निश्चित झालेले नाही.
मात्र महाविकास आघाडी कडून गेल्या आठ टर्म पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बाळासाहेब थोरात हेच उभे राहणार आहेत. मध्यंतरी त्यांची कन्या जयश्रीताई या निवडणुकीत आपले नशीब आजमावतांना पाहायला मिळू शकतात अशा चर्चांनी जोर पकडला होता.
मात्र नंतर बाळासाहेब थोरात हेच संगमनेरचा गड लढवताना दिसतील असे स्पष्ट झाले. महायुतीने अजून या जागेवर उमेदवार निश्चित केलेला नाही मात्र येथून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी यासाठी संगमनेर मध्ये तळ ठोकला आहे.
त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली असून बाळासाहेब थोरात यांच्यावर ते जोरदार हल्लाबोल करत आहेत. यामुळे संगमनेरचे वातावरण पूर्ण तापलेलं आहे. खरे तर आठ टर्म म्हणजेच 40 वर्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचं प्रतिनिधित्व केलेला आहे.
गेल्या 40 वर्षात थोरात यांना कोणीच आव्हान देऊ शकले नाही. संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. संगमनेर म्हणजेच बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात म्हणजेच संगमनेर असे या मतदारसंघाचे समीकरण. मात्र यावेळी थोरात आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्यात काटेदार लढाई होण्याची शक्यता आहे.
यामुळे यंदाच्या निवडणुकीत संगमनेरचा किल्ला कोणाच्या ताब्यात येणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. तत्पूर्वी मात्र जयश्री थोरात आणि सुजय विखे पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. यावेळी बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात त्यांची कन्या जयश्री थोरात या निवडणुकीचे सर्व जबाबदारी पाहत आहेत.
जयश्री थोरात यांच्या नेतृत्वात सध्या मतदारसंघात युवा संवाद यात्रा सुरू असून ही यात्रा आज तालुक्यातील घुलेवाडी येथे आली होती. यावेळी जयश्री थोरात यांनी सुजय विखे पाटील यांचा चांगलाचं खरपूस समाचार घेतला. यावेळी मंचावर त्यांचे पिताश्री संगमनेरचे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित होते.
त्यांच्या उपस्थितीत थोरात यांच्या लेकीने सुजय विखे पाटील यांना कठोर शब्दात खनकावले आहे. त्या म्हणाल्यात की, संगमनेर तालुका हा बाळासाहेब थोरात यांनी आपल्या परिवाराप्रमाणे सांभाळलाय. या ठिकाणी त्यांनी गोरगरिबांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे जर तुम्हाला येथे येऊन बोलायचं असेल तर शिस्तीत बोला. मी शांत, संयमी बाळासाहेबांची लेक तशीच मी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची नातं आहे. हे विसरु नका. म्हणून येथे शिस्तीत बोला नाहीतर मी चांगली खणकावून बोलू शकते.
पण येथील संस्कृती ही वेगळी आहे, असं म्हणतं डॉक्टर थोरात यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. जयश्रीताई पुढे बोलताना म्हणाल्यात की मी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये चांगल्या पगारावर नोकरीला होते. मात्र आपल्या परिवारात आधीपासूनच समाजकारणाचे संस्कार असल्याने आपण राजकारणात काम करत आहोत.
तालुक्याच्या जनतेने मला खूप चांगले प्रेम दिले आहे. पुढे त्यांनी, माझा कुणीतरी राजकन्या म्हणून उल्लेख केला. मात्र त्या लोकांचा अभ्यास अत्यंत कमी आहे. मी या तालुक्यातील मायबाप जनतेच्या परिवाराची कन्या आहे, अशा शब्दात जयश्रीताईंनी सुजय विखे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.