तालुक्यातील जनतेमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण, यंदाची निवडणूक संगमनेरातील नागरिक व महिलांनी हाती घेतली आहे ! जयश्री थोरात यांचे प्रतिपादन

बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारासाठी त्यांची लेक जयश्री थोरात सध्या संगमनेर मतदार संघ पूर्णपणे पिंजून काढताना दिसत आहेत. जयश्री थोरात यांनी आज तळेगाव भागातील काकडवाडी, पारेगाव बुद्रुक, पारेगाव खुर्द, सोनोशी, सुकेवाडी, समनापुर येथील नागरिक व महिलांशी संवाद साधला.

Jayashri Thorat News

Jayashri Thorat News : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 विधानसभा मतदारसंघात सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रचारासाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी कडून प्रचार सभांचा झंझावात सुरू आहे.

संगमनेरमध्ये देखील दोन्ही गटांकडून जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. मात्र असे असले तरी महायुतीकडून ऐनवेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या ऐवजी शिंदे गटाचे अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने संगमनेरची निवडणूक विद्यमान आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या बाजूने झुकली असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारासाठी त्यांची लेक जयश्री थोरात सध्या संगमनेर मतदार संघ पूर्णपणे पिंजून काढताना दिसत आहेत. जयश्री थोरात यांनी आज तळेगाव भागातील काकडवाडी, पारेगाव बुद्रुक, पारेगाव खुर्द, सोनोशी, सुकेवाडी, समनापुर येथील नागरिक व महिलांशी संवाद साधला.

यावेळी या परिसरातील नागरिकांनी आणि महिलांनी जयश्री थोरात यांचे स्वागत करत त्यांना जोरदार प्रतिसाद दाखवला. यावेळी बोलताना जयश्री थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे आ. बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले आहेत.

कालव्यांद्वारे आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आले आहे. पण, भोजापूर चारीसह निळवंडे कालव्यातून जे भाग वंचित राहिले आहेत त्या सर्वांना पाणी देण्यासाठी आमदार थोरात यांचे काम सुरू असून या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही असे प्रतिपादन केले आहे.

पुढे बोलताना जयश्री ताई यांनी, संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा असूनही आ. बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत. संगमनेर तालुका त्यांनी आपला परिवार मानला आहे. तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या विकासासाठी त्यांनी काम केले आहे.

त्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे आणि यंदाची निवडणूक तालुक्यातील नागरिक व महिलांनीचं आपल्या हातात हाती घेतली आहे, असं म्हणतं पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

तसेच, निळवंडे धरण व कालवे हे आमदार बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनचं दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आले आहे.

तसेच, निळवंडे धरणाच्या पाण्यापासून जो भाग वंचित राहिला आहे, त्याला पाणी देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी नियोजन केले आहे. आ. थोरात यांनी उपसा जलसिंचन योजना मंजूर करून ठेवल्या होत्या. मात्र, विद्यमान पालकमंत्री यांनी त्या रद्द केल्या आहेत.

परंतु आता 20 तारखे नंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे अन निळवंडे कालवे व भोजापूरच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही, असं म्हणतं जयश्री ताई यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe