Jitendra Awad : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच चर्चेत आले आहे. औरंगजेब आणि शायिस्तेखान होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे ते अडचणीत आले आहेत. यावर आता गोपीचंद पडळकर यांनी देखील टीका केली आहे.
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरद पवार समशुद्दीन, अजित पवार अझरुद्दीन आणि जितेंद्र आव्हाड जितुद्दीन झाले असते’, शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून बोलत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणावरून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर जोरदार निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार मताच्या राजकारणासाठी गरळ ओकण्याचे काम जितेंद्र आव्हाड करतात, असेही ते म्हणाले.
दरम्यान आव्हाड यांच्या विधानावर भाजपच्या एका नेत्याने धक्कादायक विधान केले आहे. जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशारा भाजपने दिला आहे.
दरम्यान, यामुळे आता भाजपा आक्रमक झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर जालन्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. तसेच मोर्चा देखील काढण्यात आला.