Jitendra Awhad On Ajit Pawar : येत्या काही महिन्यात राज्यासह संपूर्ण देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल किंवा मे 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतील. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात की, लगेचच काही महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका देखील राहणार आहेत. यामुळे निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत.
निवडणुकीत आपलाच जय व्हावा यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडण्यापूर्वी राष्ट्रवादीकडे अहमदनगर जिल्ह्यात 6 आमदार होते. म्हणजेच अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा एका प्रकारे बालेकिल्लाच होता. पण राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि अजित पवार गटाकडे चार आमदार गेलेत.

अजित पवार गट महायुतीसोबत सत्तेत विराजमान आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अहमदनगर जिल्ह्यातील सध्या स्थितीला पकड कमजोर झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. हेच कारण आहे की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजपासून पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर जिल्ह्यातील साई नगरी शिर्डीत अधिवेशन बोलावले आहे.
या अधिवेशनात शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे काही निवडक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात काही कार्यकर्त्यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने हे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात आगामी लोकसभेसाठीच्या पूर्वतयारीची विस्तृत चर्चा होणार आहे. दरम्यान या राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी जितेंद्र आव्हाड यांनी देखील हजेरी लावली आहे.
यावेळी आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद देखील साधला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी एक मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे. आव्हाड यांनी म्हटल्याप्रमाणे, अजित पवारांना रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना द्यायचे होते. हेच कारण होते की, सुरुवातीला अजित पवार यांनी मला पालकमंत्रीपद मिळणारच नाही, अशी सोय केली असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला यावेळी केला आहे.
विशेष म्हणजे यासाठी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा हवाला दिला आहे. आव्हाड यांनी यावेळी सांगितले की, “गेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे मिळून पालकमंत्री ठरवण्याचे काम पाहत होते. यात शरद पवार यांची कोणतीही सक्रिय भूमिका नव्हती. यामुळे मी त्यावेळी अजित पवार यांना भेटून पालकमंत्रीपदाची मागणी केली होती.
त्यानंतर एकनाथ शिंदे हे मला भेटले असता शिंदेनी मला आम्हाला रायगड हवं होतं, त्यामुळे आम्ही तुम्हाला पालघरचं पालकमंत्रीपद द्यायला तयार होतो असे सांगितले होते. पण, अजित पवार यांनी रायगडचे पालकमंत्रीपद सोडण्यास नकार दिला होता. कारण की, पवार यांना अदिती तटकरे यांना रायगडच पालकमंत्री द्यायचं होत.
दरम्यान आव्हाड यांनी त्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्याकडून योग्य दोन तास पालकमंत्री पदाचा कारभार का काढून घेण्यात आला याबाबत देखील प्रश्न उपस्थित केला. मला एवढी सावत्र वागणूक का देण्यात आली असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.