K Chandrasekhar Rao :सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव हे महाराष्ट्र राज्यात आपले प्रस्थ वाढवत आहेत. यासाठी त्यांनी नांदेडमध्ये मोठा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच घेतला होता. आता त्यांना महाराष्ट्रात नवे मित्र हवेत. यासाठी त्यांनी चाचपणी सुरु केली आहे.
यामध्ये अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये केसीआर यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांना तुम्ही नेतृत्व करा, अशी विनंती केली आहे. तसेच माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांचीही केसीआर यांच्यासोबत भेट झाली आहे. प्रकाश आंबेडकर येत्या 17 तारखेला तेलगंणात केसीआर सोबत एका सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.
यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केसीआर यांना राज्यात बडा नेता हवा आहे. त्यामुळे केसीआर यांचा महाराष्ट्रातला मराठी चेहरा कोण असेल ? याची चर्चा सुरु झाली आहे.
नांदेडमधील सभेत त्यांनी तीन माजी आमदारांना आपल्या पक्षात घेतले होते. केसीआर यांना महाराष्ट्रातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी मराठी नेत्यांशी बोलणी सुरु केली आहे. या तीन नेत्यांशिवाय आणखी काही समविचारी नेत्यांसोबत ते चर्चा करणार आहे.
दरम्यान, केसीआर यांच्या नांदेड सभेनंतर महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांत बीआरएसची वाहने फिरणार आहेत. या सर्व वाहनांची सुरुवात शिवनेरी गडापासून केली जाणार आहे. यामुळे आता त्यांना महाराष्ट्रात किती यश मिळणार हे लवकरच समजेल. मात्र पक्ष वाढीसाठी ते फिरत आहेत.