भूमिपुत्र चळवळीच्या माध्यमातून होत असलेल्या पक्ष प्रवेशामुळे राम शिंदे जोमात, रोहित पवार कोमात…

Tejas B Shelar
Published:
Karjat-Jamkhed News

Karjat-Jamkhed News : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक ही विशेष हाय प्रोफाईल बनली आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही या विधानसभा मतदारसंघात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी लढत होणार आहे.

विशेष म्हणजे महायुतीचे राम शिंदे आणि महाविकास आघाडीचे रोहित पवार यांच्या माध्यमातून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. ही निवडणूक सध्या ‘भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा’ अशी बनली आहे.

आतापर्यंतच्या राजकीय घडामोडी पाहता या निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे हे आघाडीवर आहेत. प्रचारात तर रामाभाऊंनी आघाडी घेतलीचं आहे शिवाय गेल्या काही दिवसांमध्ये मतदारसंघांमधील अनेक गावांमधील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे.

रोहित पवारांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील राम शिंदे यांच्या नेतृत्वाकडे पाहून बीजेपी मध्ये दाखल झाले आहेत. यामुळे ऐन निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार रोहित पवार यांना मोठा राजकीय फटका बसला आहे.

शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघात मोठे खिंडार पडले असून याचा परिणाम आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असल्याने माजी मंत्री शिंदे यांची मतदार संघातील राजकीय ताकद आणखी वाढली आहे.

शिंदे यांच्याकडूनही या संधीचे सोने केले जात आहे आणि मतदारसंघात जोरदार वातावरण निर्मिती सुरू आहे. दरम्यान काल अर्थातच सहा नोव्हेंबरला मतदारसंघातील तरडगाव, सोनेगाव, पिंपळगाव, खर्डा, बांधखडक, सरदवाडी, वंजारवाडी या गावांमध्ये देखील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतलाय.

यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले असल्याचे बोलले जात आहे. रोहित पवार यांच्या कारभाराला कंटाळून शरद पवार गटाचे कर्जत तालुका उपाध्यक्ष श्री गणेश नलवडे यांनी त्यांच्या शेकडो सहकार्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश घेतलाय.

देवदैठण मधील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते अन धांडेवाडी मधील असंख्य स्वाभिमानी भूमिपुत्रांनी रामाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

तसेच राजेवाडीचे सरपंच दादा कुमटकर, उपसरपंच विक्रम गोरे, रामा गोरे, लहू कुमटकर, धनंजय कुमटकर सतीश निंबाळकर यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपा सरचिटणीस उदयसिंह पवार पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतलाय.

मुंजेवाडी मध्ये देखील स्वर्गीय रामदास उर्फ अण्णा देवमुंडे यांचे पुत्र श्री प्रताप देवमुंडे यांनी रोहित पवार यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे.

खूरदैठण येथील 100 पेक्षा अधिक तरुणांनी, मिरजगाव परिसरात पैलवान स्वप्निल माने व त्यांच्या सहकार्यांनी, तेलंगशी मध्ये असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, जळकेवाडी येथील सरपंच श्री किरण पावणे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह बीजेपीमध्ये प्रवेश घेतला.

पाडळी, महारुळी, गुरेवाडी आणि आघी येथील 225 युवकांनी हाती कमळ घेतले आहे. धामणगाव येथील शेकडो कार्यकर्ते, देवदैठण मधील सोसायटी चेअरमन, दोन संचालक, दोन ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी, डोणगाव येथील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 50 युवकांनी, पिंपरखेडमधील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी रोहित पवारांच्या मनमानी कारभाराला हिसका दाखवत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतलाय. जामखेड तालुक्यातील कवडगाव येथील युवकांनी देखील बीजेपीत जाण्याचा निर्णय घेतलाय. धामणगाव, खांडवी, गोयकरवाडी, शिंपोरा (नवे व जुने) येथील कार्यकर्त्यांनी, कोल्हेवाडी गावाचे सरपंच बळीराम कोल्हे यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते, कर्जत तालुक्यातील घुमरी येथील रोजगार सेवा संघटना जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब अनभुले, चेअरमन सतीश अनुभुले, लक्ष्मण पांडुळे, बाळासाहेब पांडुळे, अहिलाजी गाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.

याशिवाय, जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्याकडून मिळत असणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे भारतीय जनता पक्षात दाखल होण्याचा निर्णय घेतलाय.

एकंदरीत सध्या विधान परिषद आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत कर्जत जामखेड तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू आहे. विशेष म्हणजे मतदारसंघातील जवळा येथील ग्रामस्थांनी राम शिंदे यांना आर्थिक मदत सुद्धा केली आहे.

जवळा गावातील गोरगरीब जनतेने आपल्या कष्टाचे पैसे रामाभाऊंना देऊ केले आहेत. कदाचित ते पहिलेच असे उमेदवार असतील ज्यांच्या निवडणुकीसाठी नागरिकांकडून मदत होत आहे. जवळा ग्रामस्थांनी राम शिंदे यांना 51 हजार रुपयांची मदत केली आहे. यामुळे सध्या ही गोष्ट नगरच्या राजकीय वर्तुळात l विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

राम शिंदे यांच्या माध्यमातून जी भूमिपुत्र चळवळ सुरू करण्यात आली आहे त्या चळवळीमुळे मतदारसंघात भारतीय जनता पक्ष अधिक ताकतवर बनत चालला आहे. यामुळे राम शिंदे यांची राजकीय ताकद वाढत असून याचा फायदा त्यांना निवडणुकीत होणार असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात आले आहे. कर्जत जामखेड तालुक्यात सुरू झालेल्या या भूमिपुत्र चळवळीमुळे सध्या महायुती कडून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. राम शिंदे हे ड्रायव्हिंग सीटवर बसले आहेत एवढे नक्की.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe