Karnataka Elections : सध्या कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यासाठी आता सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. १० मे ला मतदान होणार आहे, तर १३ मेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे असताना एबीपी न्यूजचा एक सर्व्हे समोर आला आहे. यात भाजपाचा पराभव होत असून, काँग्रेस सत्तेवर येत असल्याचे दाखवले आहे. यामुळे भाजप नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. काँग्रेसमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सर्व्हेत २४ हजार ७५९ हजार लोकांची मते जाणून घेण्यात आली आहे. त्यानुसार काँग्रेसला ११५ ते १२७ जागा मिळू शकतात. भाजपाला ६८ ते ८० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, जनता दल (सेक्युलर) या पक्षाचे २३ ते ३५ उमेदवार निवडून येऊ शकतात. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने सध्या जोरदार तयारी केली आहे.
राहुल गांधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी राज्यात दाखल होणार आहेत. राहुल गांधी 5 एप्रिलला कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत. ते 5 एप्रिलपासून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शुभारंभ करणार आहेत.