Kasba by-election : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या रॅलीत गोंधळ उडाल्याची बातमी समोर आली. अजित पवार रात्री कसब्यात प्रचारासाठी आले असता हा गोंधळ झाला. यामुळे काहीवेळ वातावरण गरम झाले होते.
अजित पवार यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात देखील होते. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शेवटी अजित पवार खाली उतरले आणि थोड्या अंतरावर पायी चालत गेले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना दूर नेत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने त्यांना वाद निवळण्यात यश आले. या गोंधळानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अजित पवारांची रॅली शनिवार वाड्यापासून सुरु झालेली. तर तिथून काही अंतरावर चौकाजवळ असलेल्या शाळेत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु होती. याच दरम्यान हा गोंधळ झाला.
एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला भाजप आणि शिवसेनेचे देखील कार्यकर्ते होते. ही रॅली संबंधित परिसरातून जात असताना तेव्ही भाजप, शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंचे गाण डिजेवर लावल. यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यामुळे वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली.