Kasba by-election : भाजपचा बालेकिल्ला ढासळला! कसब्यात काँग्रेसचा विजय, कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल

Published on -

Kasba by-election : सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामुळे कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. असे असताना आता कसब्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयाच्या जवळ गेले आहेत. आता विजयाची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे.

यामुळे भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने याठिकाणी मोठी ताकद उभा केली होती. सर्व मंत्री याठिकाणी प्रचारात उतरले आहेत. सध्या धंगेकर आघाडीवर असताना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.

यावेळी कार्यकर्त्यांनी एकच घोषणा दिल्या. यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसब्यात, तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवडमध्ये पोटनिवडणुक होत आहे.

भाजपने पैशांचा पाऊस पाडला तर लोकांनी मतांचा पाऊस पडल्याचे धंगेकर म्हणाले. भाजपचा बालेकिल्ला वा पारंपारिक मतदारसंघ राहिलेल्या पेठांमधील लोकांनी यो पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेंऐवजी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी असल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर यांनी मतमोजणीत आघाडी राखली. ती सातत्याने कमी अधिक प्रमाणात राहिल्याचे पाहायला मिळाले. भाजपचा प्रभाव असलेल्या पेठांमधील फेरीत रासने ही पिछाडी भरुन काढतील असा अंदाज होता. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe