Kasba by-election : काल पुण्यात कसबा आणि चिंचवड मध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. यामुळे याकडे राज्याचे लक्ष लागले होते. असे असताना अनेक ठिकाणी अनुसूचित प्रकार देखील घडले. काही ठिकाणी बाचाबाची देखील झाली. यामुळे वातावरण गरच तापले होते.
यावेळी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केले होते. याप्रकरणी रासने यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विरोधकांनी आवाज उठवला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी याबाबत मागणी केली होती. कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केलेल्या रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे, असे त्यांनी म्हटले होते. कसबा पेठ पोटनिवडणूक अनेक कारणामुळे चर्चेत आहे.
याठिकाणी काल मतदार यादीत नाव नसल्याने काही ठिकाणी मतदारांना मतदान करता आले नाही. तर काही मतदार याद्यांमध्ये मयतांची नावे आहेत. त्यामुळे अनेकांना मतदानाचा अधिकार बजावण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच भाजप पैसे वाटत असल्याचे देखील विडिओ व्हायरल झाले होते. आता निकाल २ मार्चला आहे. यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केलेल्या या निवडणुकीत काय होणार यावर अनेक गणित अवलंबून आहेत. यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.