Kasba by-election : अजित पवारांनी नेमकं कोणतं इंजेक्शन आणलं? भाजपने दिलं थेट आव्हान…

Ahmednagarlive24 office
Published:

Kasba by-election : पुण्यात सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीत याठिकाणी मुख्य लढत होत आहे. यामुळे आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. कालच्या सभेत आजारी असताना लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी इंजेक्शनची तजवीज केल्याचा अजित पवार यांनी सांगितले.

असे असताना आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी अजित पवारांनी कोणत इंजेक्शन आणून दिले, त्याचे नाव सांगण्याचे आवाहन केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या रंगली आहे. कसब्यात आजारी गिरीश बापटांना ऑक्सिजन सिलेंडर लावून प्रचारात उतरवण्यावरुन मविआ टीका करतेय. त्यात आता चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या उपचारावरुनही आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

दरम्यान, आपल्या पक्षासाठी मुंडे भाऊ- बहीण रिंगणात उतरले आहेत. काल पंकजा मुंडेंनी चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगतापांसाठी सभा घेतल्यानंतर आता धनंजय मुंडेंनी मविआचे उमेदवार नाना काटेंसाठी सभा घेतली.

यामुळे सध्या पुण्यात वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार  यांच्या रॅलीत गोंधळ उडाल्याची बातमी समोर आली. अजित पवार रात्री कसब्यात प्रचारासाठी आले असता हा गोंधळ झाला. यामुळे काहीवेळ वातावरण गरम झाले होते.

अजित पवार यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात देखील होते. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शेवटी अजित पवार खाली उतरले आणि थोड्या अंतरावर पायी चालत गेले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना दूर नेत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने त्यांना वाद निवळण्यात यश आले. या गोंधळानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अजित पवारांची रॅली शनिवार वाड्यापासून सुरु झालेली. तर तिथून काही अंतरावर चौकाजवळ असलेल्या शाळेत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु होती. याच दरम्यान हा गोंधळ झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe