Kasba Pattern : पुण्यातील ‘या’ तीन भाजप आमदारांची उडाली झोप? कसबा पॅटर्नची पुण्यात रंगली चर्चा..

Published on -

Kasba Pattern : राज्यातील एकाच निवडणुकीमुळे भाजप नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. ही निवडणूक म्हणजे कसबा पोट निवडणूक होय. या पोटनिवडणुकीत भाजपचा 30 वर्षांपासून असलेला अभेद्य किल्ला महाविकास आघाडीने एकत्रित काम करून जिंकला. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला.

भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 10 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. यामुळे याचा इतर मतदार संघात परिणाम दिसणार असल्याने अनेक भाजप आमदारांच्या झोपा उडाल्या आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत 5 हजारांपेक्षा कमी फरकाने भाजपने तीन विधानसभा जिंकल्या. यामध्ये
शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला या तीन मतदारसंघाचा समावेश आहे. आता याठिकाणी महाविकास आघाडी आपला कसबा पॅटर्न वापरून काठावर निवडून आलेल्या या आमदारांना पराभूत करण्यासाठी सज्ज झाली आहे.

याठिकाणी वंचीत आघाडीने देखील निर्णायक मते मिळवली होती. आता वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केलेली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची भूमिका देखील या तीनही मतदार संघात अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची या तिन्ही मतदारसंघात ताकद ही अगदीच कमी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा पहिला आणि महत्त्वाचा सकारात्मक मुद्दा मानला जात आहे. यामुळे जर सगळं गणित व्यवस्थित जुळले तर याठिकाणी भाजपचा पराभव होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe