अंगणवाडी सेविकांच्या मानधनात मोठी वाढ ! आता मिळणार ‘इतकं’ सुधारित मानधन; ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या मानधनातही झाली वाढ, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर आज राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प सादर होत आहे. शिंदे फडणवीस सरकारचा हा पहिला-वहिला अर्थसंकल्प विशेष खास राहिला आहे. वास्तविक 2024 मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राहणार आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकार मध्ये उपमुख्यमंत्री अन वित्तमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील जवळपास सर्वच वर्गातील नागरिकांना मोठी खुशखबर दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आजच्या या अर्थसंकल्पात विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढीसाठी राज्यभर संप पुकारला होता.

त्यावेळी शिंदे फडणवीस सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याच जाहीर केलं होत. याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीची घोषणा केली आहे. आता आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात मोठी वाढ झाली असून या कर्मचाऱ्यांचा लढा अखेर कार यशस्वी झाला असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून समोर येत आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार, आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये करण्यात आले आहे. गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये करण्यात आले आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये करण्यात आले आहे. तसेच अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये करण्यात आले आहे.

निश्चितच फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांच्या हिताचा असून यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जोर धरणारी मागणी पूर्ण झाली असल्याच सांगितलं जात आहे. यासोबतच फडणवीस यांनी शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केली जाईल असं गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं.

याच पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी शिक्षण सेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयाची वाढ केली जाणार असल्याची मोठी घोषणा आज केली आहे. निश्चितच, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीचा प्रश्न निकाली निघाला असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानीचे वातावरण पाहावयास मिळत आहे.