Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच वेगाने फिरू लागले आहे. लोकसभेच्या अनुशंघाने खा. सुजय विखे यांना तिकीट मिळाले व चर्चा सुरु झाल्या त्यांना असणारा भाजपांतर्गत विरोध. यात आघाडीवर नाव होते आ. राम शिंदे यांचे. कारण त्यांनी तिकीट वाटपाच्या आधीपासूनच विखे यांना प्रखर विरोध केला होता.
तसेच आ.निलेश लंके यांच्या स्टेजवर व त्यांच्यासोबाबत अनेकदा ते दिसले होते. त्यामुळे खा. सुजय विखे यांना लोकसभेसह तिकीट मिळताच आ. राम शिंदे हे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. परंतु कालपासून वेगळेच राजकीय वारे वाहू लागले आहे.

दिवसभर विविध घडामोडी घडल्यानंतर काल (सोमवार) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सायंकाळी आ. राम शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तेथे बंद दाराआड त्यांची दीड तास चर्चा झाली. त्यामुळे आगामी गणिते कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राम शिंदे यांकडून सत्कार व सुजय विखेंकडून माफीनामा
माउली संकुलात सोमवारी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पूर्वनियोजन आढावा बैठक पार दबली. या बैठकीत आ. राम शिंदे यांनी खा. सुजय विखे यांचा सत्कार केला व विखे यांची उमेदवारी मला मान्य असल्याचे सूतोवाच केले.
तसेच यावेळी सुजय विखे यांनी माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा भाजपचे कायकर्ते दुखावले गेले असतील तर माफी मागतो असे वक्तव्य केले. आता हे वक्तव्य हे कुणा भाजप कर्यकर्त्यांसाठी होते की राम शिंदे यांच्यासाठी होते हे मात्र चर्चेचा विषय होते.
पालकमंत्री विखे व आ. शिंदे यांची बंद दाराआड चर्चा
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांची सोमवारी (18 मार्च) सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेत तब्बल दीड तास चर्चा केली. या चर्चेमध्ये या दोघा नेत्यांत काय चर्चा झाली याचा तपशील मात्र बाहेर येऊ शकला नाही.
ही भेट म्हणजे विखेंचे पक्षातील ‘डॅमेज कंट्रोल’साठी होती अशी चर्चा सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे या भेटीवेळी कोणताही भाजप पदाधिकारी त्याठिकाणी उपस्थित नव्हता व या चर्चेनंतर या दोघा नेत्यांनी पत्रकारांना तपशील देणे टाळले असल्याने अनेक चर्चाना उधाण आहे.
त्यामुळे आता विखे यांचा माफीनामा व पालकमंत्री व आ. शिंदे यांची भेट हे खासदार विखेंसाठी पुन्हा लोकसभेचे द्वार उघडण्यासाठी यशस्वी ठरेल का अशा चर्चा सध्या नागरिक करत आहेत.