नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी ! २४ तास मतमोजणीनंतर ‘असा’ लागला निकाल

विधान परिषदेसाठी नुकत्याच पार पडलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांची मतमोजणी झाली असून याचे निकाल आता हाती आले आहेत. चोवीस तासांपासून ही मतमोजणी सुरु होती. या निवणुकीमध्ये अखेर शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी विजयाचा झेंडा रोवला आहे

Pragati
Published:
darade

विधान परिषदेसाठी नुकत्याच पार पडलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांची मतमोजणी झाली असून याचे निकाल आता हाती आले आहेत. चोवीस तासांपासून ही मतमोजणी सुरु होती.

या निवणुकीमध्ये अखेर शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी विजयाचा झेंडा रोवला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे व अपक्ष विवेक कोल्हे यांसह बाकी उमेदवारांचा पराभव झाला आहे.

मतमोजणी सुरु झाली तेव्हा पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे किशोर दराडे, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात रस्सीखेच सुरु होती. यामध्ये दराडे पहिल्या दोन्ही फेऱ्यांमध्ये पहिला व दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर राहिल्याचे पाहायला मिळाले.

मतमोजणीवेळी कोणत्याही उमेदवाराने पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतांचा कोटा (31576 मतांचा कोटा) पूर्ण करू शकले नाहीत. त्यानंतर दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर दराडे यात विजयी झाले.

कुणी कोठे मारली बाजी
राज्यात चार जागांवर विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघात ही निवडणूक संपन्न झालेली होती. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दोन जागा जिंकल्या की ज्यात मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक या जागेचा समावेश आहे.

कोकण पदवीधरमध्ये भाजपने निरंजन डावखरे यांच्या विजयाच्या रूपाने बाजी मारली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नाशिकमधून किशोर दराडे यांच्या माध्यमातून एक जागा मिळाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe