एसीच्या हवेमुळे होऊ शकतो ‘ सिक बिल्डिंग सिंड्रोम ‘ ! असा करा इलाज.

Pragati
Published:
sick bulding sindrom

वातानुकूलित खोलीत राहण्याचे नुकसान आपण अनेकदा ऐकले आहे, परंतु आता तज्ज्ञ डॉक्टरांनी आणखी एका समस्येबाबत इशारा दिला आहे. त्यांच्या मते, एसी रूम किंवा ऑफिसमध्ये सतत बसून सिक बिल्डिंग सिंड्रोम (एसबीएस) संबंधी आरोग्य समस्या उद्भवू शकतात. या सिंड्रोममुळे डोळे, घसा आणि त्वचेचा

कोरडेपणा आणि जळजळ यांसारखी लक्षणे उद्भवतात, जी एसीच्या कोरड्या हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहण्यामुळे होतात. उन्हाळ्यात सतत एसीत वावरल्याने असल्या एसबीएससारख्या आजारांचा धोका वाढतो, अशा परिस्थितीत आपण काय उपाययोजना करू शकतो ते पाहुयात.

एसबीएसचा धोका कसा कमी करायचा?
‘सिक बिल्डिंग सिंड्रोम ‘शी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जाऊ शकतात. सर्वप्रथम घरातील जागेत योग्य आर्द्रता राखणे महत्त्वाचे आहे, कारण एसीच्या कोरड्या हवेमुळे अस्वस्थता येते, जी आरोग्यासाठी हानीकारक असते. एसी फिल्टरची नियमित साफसफाई करणेदेखील आवश्यक आहे,

जेणेकरून त्यामधल्या धूळ जमा होणार नाही, ज्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होणार नाही. तुम्ही नैसर्गिक वायुविजनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.जेव्हा बाहेरचे तापमान सामान्य असेल तेव्हा खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा. घरात क्रॉस व्हेंटिलेशन असेल अशी योजना करा. खोलीतील

हवा स्वच्छ ठेवण्यासाठी घरात कुंडी ठेवून झाडे लावता येतात. ही झाडे हवा शुद्ध करण्याचे काम करतात, कारण ती कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेतात आणिऑक्सिजन सोडतात. तसेच खोलीतील उपलब्ध एअर प्युरिफायर वापरू शकता, ज्यात एसईपीए फिल्टर आहेत. हे हवेतील कण आणि अॅलर्जी

काढूनटाकतात. हायड्रेटेड राहणे हादेखील एक महत्त्वाचा उपाय आहे. जर तुम्ही दिवसभर योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर ते श्लेष्माच्या पडद्यामध्ये ओलावा टिकवून ठेवेल, ज्यामुळे डोळे, घसा आणि त्वचेला कोरडेपणाचा सामना करावा लागणार नाही.

एसीची हवा आरोग्यासाठी चांगली नाही
सततच्या वातानुकूलित वातावरणातील हवेमुळे श्वसनाच्या समस्या वाढू शकतात, विशेषतः अॅलर्जी किंवा दमा असलेल्या लोकांमध्ये. जरी एसी वापरामुळे डोळे किंवा हृदयासारख्या विशिष्ट अवयवांना थेट इजा होत नसली, तरी यामुळे संपूर्ण आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो आणि विद्यमान आरोग्य स्थिती बिघडू शकते. त्यामुळेतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe