लोकसभेसाठी लंके मैदानात उतरलेत, विखे विरोधकांना एकवटण्यासाठी आमदार निलेश लंके यांचा पुढाकार

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. या जागेसाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

महायुती मधून तसेच इंडिया आघाडी मधून या जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे. काहींनी तर वेळप्रसंगी पक्षाशी बगावत करू पण लोकसभा लढवू असा निर्धार देखील केला आहे. यामध्ये आमदार निलेश लंके यांचा देखील समावेश होतो.

खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेर मतदारसंघातील आमदार निलेश लंके यांच्या अर्धांगिनी राणी लंके यांनी आपण किंवा आपले पती लोकसभेसाठी उभे राहणार अशी भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे यासाठी पक्षांतर्गत बंड पुकारण्याची देखील त्यांनी हिम्मत दाखवली आहे.

जर पक्षाने तिकीट दिले नाही तर अपक्ष लढू, म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत नगर दक्षिण मधून लोकसभेसाठी उभे राहणार अशी भूमिका त्यांनी बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे लोकसभेसाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.

कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार की अपक्ष निवडणूक लढणार याबाबत कोणतीच माहिती न देता त्यांनी लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. खरे तर नगर दक्षिण मधून भाजपाचे डॉक्टर सुजय विखे पाटील हे सध्या खासदार आहेत. विशेष म्हणजे विखे पिता पुत्रांचा दिल्ली दरबारी वाढता दबदबा पाहता या आगामी लोकसभेसाठी सुजय विखेंना या ठिकाणी महायुतीतून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे.

यामुळे त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यासाठी पुन्हा एकदा गावोगावी जाऊन मोफत साखर आणि चणाडाळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जनसंपर्क वाढवून ते पुन्हा एकदा आगामी लोकसभेसाठी तिकीट मिळावे म्हणून पक्षश्रेष्ठींवर दबाव आणत आहेत. दुसरीकडे अनेक जाणकार लोकांनी महायुती मधून सुजय विखे यांनाच तिकीट मिळणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

पण सुजय विखे यांना या लोकसभेत तिकीट मिळवताना नाकी नऊ येणार अशी शक्यता आहे. कारण की महायुतीत समाविष्ट असलेल्या अजित पवार गटाचे पारनेर लोकसभा मतदारसंघातील आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी या जागेवरून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

यामुळे महायुतीत वादंग उठण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत येथून निर्णय लढवणारच असे स्पष्ट केले आहे. सध्या आमदार लंके आणि विखे कुटुंब राज्याच्या सरकारमध्ये समाविष्ट आहेत. मात्र या दोघांचे राजकीय मतभेद हे सर्व जिल्ह्याला ठाऊक आहेत.

यामुळे आमदार लंके फक्त विखे कुटुंबांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत की खरोखरीच या जागेवरून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. विशेष म्हणजे जर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांना महायुती मधून तिकीट मिळणारच का आणि जर तिकीट मिळाले नाही तर ते पुन्हा शरद पवार गटाकडे माघारी जाणार का किंवा अपक्ष निवडणूक लढवणार या सर्व गोष्टी अजून तरी गुलदस्त्यातच आहेत. पण आमदार लंके यांच्या अर्धांगिनी यांनी काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने त्यांनी विखे विरोधी आवाज एकवटण्याचे काम सुरू केले आहे.

विखे यांच्या विरोधातील नाराजीची भावना एकत्रित करण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे डॉक्टर सुजय विखे यांना आमदार राम शिंदे यांनी देखील आव्हान दिले आहे. भाजप आमदार राम शिंदे यांनी दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मात्र त्यांची मनातील गोष्ट ओठावर आली असली तर पक्षश्रेष्ठींमुळे ते सध्या शांत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही जाणकार लोक आमदार राम शिंदे जरी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते असले तरी देखील विखे यांच्या वजना पुढे त्यांचे धकणार नाही असे सांगत आहेत.

हेच कारण आहे की सध्या शिंदे शांत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु आमदार लंके आणि त्यांच्या अर्धांगिनी यांनी या जागेसाठी जनसंपर्क वाढवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. यासाठी शिवस्वराज्य यात्रा मतदारसंघातून निघाली आहे.

दुसरीकडे शिंदे आणि लंके यांच्यात राजकीय संबंध आणखी घट्ट होत आहेत. दोघेहीजण विकेपीथा पत्रांवर दबाव बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. विखे विरोधी भूमिका घेण्यात दोघेही जण मागेपुढे पाहणार नाहीत असे चित्र आहे. खरे तर विखे पिता पुत्रांचा मतदारसंघात चांगला दबदबा आहे. यामुळे विरोधी पक्षातून विखें विरोधात आवाज बुलंद होत नाहीये. मात्र स्वपक्षातून आमदार राम शिंदे आणि मित्र पक्षातून आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या विरोधा…

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe