राजकारणात विश्वास संपादनासाठी नेतृत्वाचे चरित्र चांगले असायला हवे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर राजकारणात लोकांचा विश्वास संपादन करायचा असेल, तर त्या नेतृत्वाला विश्वास संपादनासाठी चालचलन, चरित्र चांगले असावे लागते. त्यामुळे समाजातील प्रत्येक क्षेत्रात विश्वस्त नेता गरजेचा आहे.

मर्चेंट बँकेने ५० वर्षांच्या इतिहासात ठेवीदारांसाठी, ग्राहकांसाठी संचालक मंडळाने निर्माण केलेली गोष्ट म्हणजे विश्वास आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अहमदनगर मर्चन्टस् बँकेच्या सुवर्ण महोत्सवाचा समारोप सोहळा व चेअरमन हस्तिमल मुनोत यांचा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते सहकार यात्री उपाधी देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. राम शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सुवर्णमहोत्सवी वर्षे समितीचे अध्यक्ष अनिल पोखरणा, बँकेचे उपाध्यक्ष अमित मुथा आदी उपस्थित होते.

मंत्री गडकरी म्हणाले, उद्योग व्यापार करणारे लोक केवळ संपत्ती निर्माण करत नाहीत, तर ते रोजगाराचीही निर्मिती करतात. सर्वांना अशी अर्थव्यवस्था निर्माण करायची, जी रोजगाराची निर्मिती करेल.

देशाचा विकास करायचा असेल तर रोजगार निर्मिती केली पाहिजे. या निर्मितीसाठी उद्योग व व्यापार वाढला तर भांडवली गुंतवणूक येईल, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe