Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता थांबली आहे. काल विधानसभेच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता साऱ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी राज्यात कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते.
यामुळे, महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत देखील चांगले यश मिळणार म्हणून शाश्वत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत सुद्धा मविआ आघाडीला चांगला प्रतिसाद मिळणार असे म्हटले जात आहे. दुसरीकडे, महायुतीच्या नेत्यांकडून गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक कौतुकास्पद योजना सुरू केल्या असून या कल्याणकारी योजनांच्या जोरावर अन विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असे म्हटले जात आहे.
तथापि राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे सरकार हे 23 तारखेलाचं क्लिअर होणार आहे. पण, मतमोजणी होण्याआधी विविध एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. दैनिक भास्करच्या एक्झिट पोलची आकडेवारी सुद्धा समोर आली आहे. मात्र, या आकडेवारीने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
कारण की, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचा वरचष्मा पाहायला मिळणार असे या एक्झिट पोल मध्ये सांगितले गेले आहे. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात सत्ता स्थापित करण्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ आवश्यक असते. यामुळे महायुती की महाविकास आघाडी कोण या मॅजिक फिगरला टच करणार हे पाहण्यासारखे ठरेल.
तत्पूर्वी मात्र दैनिक भास्करच्या एक्झिट पोलमध्ये हा आकडा महाविकास आघाडी गाठत असल्याचे दाखवण्यात आले आहे. दरम्यान आता आपण या एक्झिट पोलनुसार, भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाला किती जागा मिळतील? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय सांगतो दैनिक भास्कर चा एक्झिट पोल?
दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीला या निवडणुकीत 135 ते 150 जागा आणि महायुतीला 125 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. अर्थातच या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येऊ शकते असा एक अंदाज या एक्झिट पोल मधून समोर येतोय.
महायुतीत समाविष्ट असणाऱ्या भाजपला 80-90, शिवसेना शिंदे गटाला 30-35, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 15-20 जागा मिळतील असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीत काँग्रेसला 58-60, शिवसेना ठाकरे गटाला 30-35, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा 50-55 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे.
तसच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि वंचित बहुजन आघाडीचा 2-3 जागांवर विजय होईल, तर इतर पक्ष 0-25 जागा जिंकलीत, असं या एक्झिट पोल मधून समोर आले आहे. यामुळे दैनिक भास्करचा हा एक्झिट पोल कितपत खरा ठरतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
पण जर दैनिक भास्करच्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात उलथापालथ झाली तर हा महायुतीसाठी मोठा धक्का ठरणार आहे. महाराष्ट्रातील जनतेला फोडाफोडीचे राजकारण पटलेले नाही असे यावरून सिद्ध होऊ शकते. तथापि निवडणुकीचा निकाल जेव्हा लागेल तेव्हाच महाराष्ट्रातील जनतेचा कौल नेमका कोणत्या दिशेला आहे? हे क्लिअर होणार आहे.