Maharashtra Politics : शरद पवार बोलतात तसे वागतात का ? त्यांच्याविषयी बोलायची गरज नाही…

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra Politics

Maharashtra Politics : शरद पवार यांच्याविषयी भाष्य करण्याची गरज नाही. ते बोलतात तसे वागतात का ? हे सर्वांना माहिती आहे, असे सांगत खा. सुजय विखे पाटील यांनी पवारांविषयी अधिक बोलण्याचे टाळले.

निधी वाटपाबाबत महाविकास आघाडीने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. खा. विखे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार होते.

त्यावेळी भाजपा आमदारांना निधीबाबत दुजाभाव करण्यात आला. आ. बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीला ५० टक्के निधी दिला, असे सांगितले. तर त्यांनी ती कागदपत्रे दाखवावीत, असे आव्हान खा. विखे यांनी दिले. नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामासंदर्भात येत्या ३ रोजी नगर येथे बैठक बोलविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने सर्वसामान्य माणसांसाठी अतिशय चांगली कामे केली आहेत. सरकार आपल्या दारी या माध्यमातून अनेक योजना या सरकारने राबवलेल्या आहेत. तसेच विकास कामाची गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. नगर शहरात जागांवर ताबा मारण्याचा विषय अचानकपणे सुरू झालेला आहे,

ही बाब अतिशय गंभीर असल्याचे खा. सुजय विखे यांनी सांगितले. नगर – कोपरगाव रस्त्याची जून महिन्यामध्ये निविदा प्रसिद्ध झालेली आहे. सहा महिन्यांमध्ये त्याचे काम पूर्ण केले जाईल. पंधरा लाख ते वीस लाख रुपये खर्च करून या मार्गावरचे सर्व खड्डे बुजवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe