Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये अशा काही घडामोडी घडल्या आहेत ज्यामुळे राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येणे कठीण आहे. अशातच आता शरद पवार यांच्या गटातील रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार असे संकेत मिळू लागले आहेत.
सध्या रोहित पवार यांच्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की जून 2023 मध्ये एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली.
अजित दादा पवार यांनी थोडीशी वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचा गट आणि अजितदादा यांचा गट असे दोन गट पडलेत.
दरम्यान अजित पवार यांच्या समवेत जे आमदार सत्तेत सामील झाले आहेत त्यांच्याबाबत रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. यावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हटलेत रोहित पवार
रोहित पवार यांनी अजितदादा यांच्या समवेत गेलेल्या आमदारांबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित दादा यांच्या समवेत गेलेले राष्ट्रवादीचे २२ आमदार परत शरद पवार यांच्या गटात सामील होणार आहेत.
रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय की काय ? अशा चर्चा आता पाहायला मिळत आहेत.
यामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा काही मोठी घडामोड होते का ? हे पाण्यासारखे राहणार आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी आगामी लोकसभेसाठी एकनाथ शिंदे यांच्या गटाला दहा जागा आणि अजितदादा यांच्या गटाला फक्त चार जागा मिळतील असा दावा केला आहे.
विशेष म्हणजे अमित शहा जे म्हणतील ते त्यांना ऐकावेच लागेल असे देखील त्यांनी सांगितले आहे. मात्र, अजित दादा यांची भूमिका त्यांच्या पक्षातील साऱ्या लोकांना मान्यच असेल असे होणार नाही, असे रोहित पवार यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
यावेळी रोहित पवार यांनी महायुतीला 18 ते 20 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील अशी भविष्यवाणी देखील केली आहे.