Maharashtra Politics : शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत घेणार !

Pragati
Updated:

बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदरसाठी माझा प्लॅन तयार आहे. या भागात मोठे उद्योग आणणार आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पुण्यामध्ये एमआयडीसी आली. नंतर मी जेजुरी, बारामती, इंदापूर, भिगवण, चाकण, शिरवळ येथे एमआयडीसीचे जाळे पसरले. त्यानंतर हे तालुके व्यापाराचे केंद्र बनले.

कारखानदारीमुळे व्यापार व्यवसाय वाढला. बारामती पूर्वी गुळाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होती. सध्या चित्र बदलले आहे. व्यवसायाची नवीन केंद्र उभी राहिली आहेत. येणाऱ्या काळात देखील उद्योग उभारणी केली जाईल, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत घेणार आहे. असे जेष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामतीमध्ये आयोजित व्यापारी मेळाव्यात पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मला निवडणुकीच्या आधी असं वाटायचं की राम मंदिर झालं. हा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा असेल. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाकडे कल राहील. मात्र, आपल्या देशातील लोक समंजस आहेत. मंदिराच्या नावाने तुम्ही मत मागता म्हणजे लोकांनी वेगळा निकाल दिला.

राम मंदिर ज्या आयोध्येत बांधले तेथेच भाजपचा पराभव झाला. या मुद्द्याची भीती आम्हाला वाटत होती. मात्र, मंदिराचं राजकारण कसं दुरुस्त करायचं, हे तेथील जनतेने केले. बारामती लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अनेक गोष्टी छापून येत होत्या. टीव्हीवर दिसत होत्या. मी शांत होतो. कारण मला माहिती आहे की, बारामतीकर शहाणे लोक आहेत.

तो शहाणपणा बघायला मिळाला. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण १२५० बूथ होते. पैकी ११९० बूथ वरून बारामतीकरांनी आमच्या बाजूने मतदान केले. मग आता म्हणायचं की नाही बारामतीकर शहाणे आहेत. १९६७ पासून आजपर्यंत मी तुम्हा लोकांचा शहाणपणा बघत आलो आहे.

यंदाच्या लोकसभेचा निकाल हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा झाला. सरकार बनलं, मंत्र्यांचा शपथविधी झाला. देशात स्थैर्य येईल. निवडणुका येतात वजातात. मात्र, या देशाची अर्थव्यवस्था मजबूत अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe