विधानसभा निवडणुकीआधीच राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा ! ‘या’ लोकांना मिळाली आमदारकीची संधी

निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबरला मतदान होणार आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा आज केली आहे. अर्थातच आजपासून महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान आचारसंहिता लागू होण्याआधीच राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा आज अर्थातच 15 ऑक्टोबर 2024 ला संपन्न झाला आहे. विधानसभेत हा सोहळा संपन्न झाला आहे. याच्या माध्यमातून आज विधानपरिषदेचे सात आमदार निवडले गेले आहेत. खरंतर विधानपरिषदेत राज्यपालांकडून बारा आमदार नियुक्त होत असतात.

मात्र आज फक्त सातच आमदार नियुक्त करण्यात आले आहेत. उपसभापतींच्या उपस्थितीत या सात जणांना आमदारकी देण्यात आली आहे. खरेतर आज महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबरला मतदान होणार आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा आज केली आहे. अर्थातच आजपासून महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

दरम्यान आचारसंहिता लागू होण्याआधीच राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये आज दुपारी बारा वाजता विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यपाल नियुक्त आमदारकीचा प्रश्न आता सुटलाय. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होत्या. या सात आमदारांमध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाकडून तीन, अजित पवार गटाकडून दोन आणि एकनाथ शिंदे गटाकडून दोन असे एकूण सात आमदार निवडले गेले आहेत. शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली होती.

या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली होती.त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे. राज्यपालांकडून या नावांना मंजुरी मिळाल्यानंतर आज दुपारी बारा वाजता या लोकांनी विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतली आहे.

विधान परिषदेसाठी निवडले गेलेले 7 आमदार

महंत बाबूसिंग महाराज, बंजारा समाजाचे धर्मगुरु (भाजपा)
विक्रांत पाटील (भाजपा)
चित्रा वाघ (भाजपा)
हेमंत पाटील, शिवसेना (एकनाथ शिंदे)
मनिषा कायंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे)
पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
इद्रिस इलियास नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe