Maharashtra Politics : लोकसभेला महाराष्ट्रात सर्वच पक्षांनी कंबर कसली. राजकीय पक्ष फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक. या निवडणुकीत महाराष्ट्रातील काही जागा प्रचंड गाजल्या. या जगावर केवळ मतदार संघाचं नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
यातील अव्वल स्थानी असणारी जागा म्हणजे बारामती. येथे पवार विरुद्ध पवार झालेली लढत लक्षवेधी व चर्चेची झाली. दरम्यान आता चर्चा सुरु झालीये ती म्हणजे विधानसभेची. ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार एकमेकांच्या विरोधात ठाकल्याने आता विधानसभेलाही पवार विरोध पवार सामना होईल का अशी चर्चा सध्या होऊ लागल्या आहेत.
शरद पवार आव्हान देतील ?
विधानसभेला शरद पवार हे अजित पवार यांना आवाहन देतील अशा चर्चा सध्या अनेक लोक करतायेत. पवार घरातूनच अजित पवारांना विरोधक उमेदवार असेल असे म्हटले जात आहे. यामध्ये आघाडीवर युगेंद्र पवार असे नाव समोर येत आहे.
युगेंद्र पवार हे अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. दरम्यान पवार विरोधात पवार लढतीबाबत शरद पवार यांनी एका मीडियाला प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, विधानसभेला अजून वेळ आहे, त्यावेळी रणनीती काय असू शकते हे अद्याप सांगता येणार नाही.
युगेंद्र पवार VS अजित पवार ?
युगेंद्र पवार व अजित दादा यांच्यात ही लढत होईल अशी चर्चा नागरिक करत आहेत. कारण लोकसभेपासूनच युगेंद्र पवार यांनी राजकीय भूमिका घेत मतदार संघात फिरण्यास सुरवात केली आहे. त्यांनी यावेळी अजित दादांवर टीका केल्याचेही पाहायला मिळाले.
दरम्यान याबाबत युगेंद्र पवार यांना एका मीडियाने विचारले असता ते म्हणाले, की सध्या याबाबत काही विचार मनात नाही. विधानसभेला काय चित्र असेल माहित नाही, मी सध्या फक्त जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहे.